मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Pro Kabaddi 2023 : राहुल चौधरीचं जबरदस्त पुनरागमन, जयपूरनं हरियाणाला सहज हरवलं

Pro Kabaddi 2023 : राहुल चौधरीचं जबरदस्त पुनरागमन, जयपूरनं हरियाणाला सहज हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2024 10:21 PM IST

pro kabaddi 2023 : जयपूरचा ९ सामन्यांनंतरचा हा ५वा विजय असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आले आहेत. हरियाणा स्टीलर्सचा हा चौथा पराभव असून ते सातव्या स्थानावर कायम आहेत.

pro kabaddi 2023
pro kabaddi 2023

प्रो कबड्डी लीगमध्ये आज (३ जानेवारी) जयपूर पिंक पँथर्स आणि हरियाणा स्टीलर्स (jaipur pink panthers vs haryana steelers) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने हरियाणाचा ४५-३४ असा एकतर्फी पराभव केला.

जयपूरचा ९ सामन्यांनंतरचा हा ५वा विजय असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आले आहेत. हरियाणा स्टीलर्सचा हा चौथा पराभव असून ते सातव्या स्थानावर कायम आहेत.

जयपूर पिंक पँथर्ससाठी या सामन्यात अर्जुन देशवालने सर्वाधिक १४ रेड पॉइंट घेतले तर डिफेन्समध्ये रेझा मिरबाघेरीने ७ टॅकल पॉइंट्स घेतले. हरियाणा स्टीलर्ससाठी या सामन्यात चंद्रन रणजीतने सुपर १० सह ११ रेड पॉइंट घेतले. तर डिफेन्समध्ये मोहित नंदलने ५ टॅकल पॉइंट मिळवले.

राहुल चौधरीचं पुनरागमन

जयपूर पिंक पँथरचा स्टार खेळाडू राहुल चौधरीला अखेरीस प्लेइंग ७ मध्ये संधी मिळाली. काही सामने बाहेर राहिल्यानंतर त्याने आज १२ रेडमध्ये ३ गुणांची कमाई केली. त्याने २ बोनस आणि १ टच पॉइंट मिळविला.

दरम्यान, दोन्ही संघांमध्ये सुरुवातीला चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी एकमेकांना पुढे जाऊ दिले नाही. पण शेवटी जयपूरने शानदार कामगिरी करत ३६व्या मिनिटाला स्टीलर्सला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले आणि जयपूर पिंक पँथर्सने हा सामना सहज जिंकला. हरियाणा स्टीलर्सला या सामन्यातून एकही गुण मिळाला नाही.

WhatsApp channel