भारताचा १८ वर्षीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेश याने आपल्या ऐतिहासिक विजयाने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासातच नव्हे तर भारतीय क्रीडा विश्वातही एक नवी लाट निर्माण केली आहे.
गुकेशने १४ सामन्यांच्या खडतर मालिकेत चीनच्या डिंग लिरेन याचा ७.५-६.५ असा पराभव करून २०२४ ची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. या जेतेपदानंतर तो जगातील सर्वात कमी वयाचा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात डी गुकेश या नावाची प्रचंड चर्चा होत आहे. त्याच्या यशोगाथांपासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या दरम्यानच, डी गुकेशचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला त्याच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.
व्हिडिओमध्ये डी गुकेशला त्याची गर्लफ्रेंड आहे का असे विचारण्यात आले. यावर त्याने हसून निरागसपणे उत्तर दिले, "नाही, तसे काही नाही."
यानंतर मैत्रीण असल्याने त्याच्या खेळावर परिणाम होऊ शकतो का, असे विचारले असता तो म्हणाला, ''कदाचित हे बुद्धिबळापेक्षा थोडा जास्त वेळ घेऊ शकते. पण मी यावर फारसा विचार केलेला नाही. मला हे योग्य वय वाटत नाही. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, पण यासाठी वेळ लागेल."
चेन्नईच्या गुकेशने निर्णायक १४व्या गेममध्ये डिंग लिरेनच्या एका चुकीचा फायदा घेत बाजी मारली. या शानदार विजयासह तो जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी विश्वनाथन आनंद हाही वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता.
डी गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याचा विक्रम मोडला. कास्पारोव्हने वयाच्या २२ व्या वर्षी हे विजेतेपद पटकावले, तर गुकेशने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी ही कामगिरी केली. त्याचा हा विजय बुद्धिबळाच्या १०० वर्षांहून अधिक जुन्या इतिहासाची नवीन सुरुवात करणारा आहे.
संबंधित बातम्या