मराठी बातम्या  /  क्रीडा  /  यक्रेनवरील हल्ले थांबवा, फुटबॉलपटू पेले यांचं पुतीन यांना आवाहन

यक्रेनवरील हल्ले थांबवा, फुटबॉलपटू पेले यांचं पुतीन यांना आवाहन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 02, 2022 05:49 PM IST

आपण मागच्या वेळी भेटलो तेव्हा हस्तांदोलन करत हसलो होतो. तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की आपल्यात आजच्यासारखे मतभेद असतील. सोबतच ते म्हणाले, 'ही लढाई थांबवणे तुमच्या हातात आहे.

पेले आणि पुतीन
पेले आणि पुतीन

ब्राझीलचे (brazil) महान फुटबॉलपटू पेले (footballer pele) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (russian president vladimir puteen) यांना युक्रेनवर हल्ला करणे थांबवा, (russia ukrain war) असे आवाहन केले आहे. ८१ वर्षीय पेले हे सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. विश्वचषक पात्रता सामन्यात युक्रेनने स्कॉटलंडचा ३-१ असा पराभव केला, त्याच दिवशी पेले यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपला संदेश दिला आहे.

सामन्यानंतर पेले यांनी इंस्टाग्राम पोस्ट केली आहे, यात ते म्हणाले की, "आज युक्रेनने कमीत कमी ९० मिनिटे त्यांच्या देशातील सध्याची परिस्थीती काय आहे, हे विसरायला लावले. विश्वचषकात स्थान मिळवणे नेहमीच कठीण असते, जवळजवळ अशक्यच असते. असे हल्ले थांबवा. या हिंसेचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही".

या सोबतच पुतीन यांना उद्देशून पेले म्हणाले, 'आपण मागच्या वेळी भेटलो तेव्हा हस्तांदोलन करत हसलो होतो. तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की आपल्यात आजच्यासारखे मतभेद असतील. सोबतच ते म्हणाले, 'ही लढाई थांबवणे तुमच्या हातात आहे. २०१७ मध्ये आपली मॉस्कोमध्ये शेवटची भेट झाली तेव्हा आपण ज्या हातांनी हस्तांदोलन केले होते त्याच हातात हे युद्ध थांबवण्याची ताकद आहे, असे पेले म्हणाले.

युनायटेड नेशनमधील मानवाधिकार उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लढाईत ४,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.तर ५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग