मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: शिखर धवनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; गंभीर, रहाणेचाही यादीत समावेश
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan

IPL 2023: शिखर धवनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; गंभीर, रहाणेचाही यादीत समावेश

18 May 2023, 13:49 ISTAshwjeet Rajendra Jagtap

PBKS vs DC: धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी सामना झाला.

IPL 2023: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स याच्यात बुधवारी आयपीएल २०२३ मधील ६४वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीच्या संघाने पंजाबचा १५ धावांनी पराभव केला. या पराभवासह पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला. हा सामना पंजाबचा कर्णधार शिखर धवनसाठी अतिशय वाईट ठरला. या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या धवनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमांची नोंद करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

धर्माशालाच्या हिमाचल प्रदेश येथील क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध खेळण्यात आलेला सामना पंजाबच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा होता. दिल्लीने दिलेल्या २१४ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शिखर धवन गोल्डन डकचा शिकार ठरला. शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा दुसरा सलामीवीर ठरला आहे.

आयपीएलमध्ये सलामीवीर पार्थिक पटेल सर्वाधिक ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांच्याही नावाचा समावेश आहे. हे दोघेही १०-१० वेळा शून्यावर बाद झाले. या यादीत धवनचाही एन्ट्री झाली. धवनही सलामीवीर म्हणून १० वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आयपीएल 2023 च्या ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. १७ मे (बुधवार) रोजी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु लाख प्रयत्न करूनही ते लक्ष्य गाठू शकले नाही. पंजाब किंग्जसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने ४८ चेंडूत ९४ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. यादरम्यान लिव्हिंगस्टोनने ९ षटकार आणि ५ चौकार लगावले.

विभाग