पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक खेळ सुरू असताना, गूगलने (Google) पुन्हा एकदा विशेष डूडलद्वारे पॅरा-ॲथलीट्ससाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे. आज गुरुवारी (५ सप्टेंबर) Google पॉवरलिफ्टिंग इव्हेंट साजरा करत आहे. यासाठी गूगलने खास डूडल बनवले आहे.
आजच्या गूगल डूडलमध्ये 'अरेना पोर्टे डे ला चॅपेल' या मैदानात एक कोंबडी रोल उचलताना दाखवण्यात आली आहे, तिच्या वर असलेली दुसरी कोंबडी बसून रोलचा आनंद घेत आहे.
Google Doodle पेजवर, Google ने लिहिले, "प्रतीक्षा संपली आहे, वजन सुरू झाले आहे. आजच्या Arena Porte de la Chapelle येथे पारा पॉवरलिफ्टिंग इव्हेंटसाठी सज्ज व्हा!"
वेटलिफ्टिंमधून पॅरा पॉवरलिफ्टिंगसाठीचा जन्म झाला. १९८४ च्या पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदा पॉवरलिफ्टिंगचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून हा खेळ पॅरालिम्पिकमधील लोकप्रिय खेळांपैकी एक बनला. २००० च्या सिडनी गेम्सपर्यंत महिलांना पॅरालिम्पिकमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये स्पर्धा करण्याची संधी देण्यात आली नव्हती.
४ सप्टेंबरपासून सुरू झालेली पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ८ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यामध्ये खेळाडू विविध प्रकारात स्पर्धा करतील.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या ४५ किलो गटात चीनच्या एलएल गुओने प्रथम क्रमांक पटकावला, तर ग्रेट ब्रिटनच्या जेडन न्यूजॉन आणि तुर्कीचे एन. मुरतली यांनी दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
पुरुषांच्या ४९ किलो गटात जॉर्डनचा ओ. कराडा याने सुवर्णपदक जिंकले, तर तुर्कियेच्या ए. कायापनर याने रौप्यपदक आणि व्हिएतनामच्या व्हीसी ले याने कांस्यपदक जिंकले.
पुरुष ४९ किलो, ५४ किलो, ५९ किलो, ६५ किलो, ७२ किलो, ८० किलो, ८८ किलो, ९७ किलो, १०७ किलो आणि १०७ किलोपेक्षा जास्त वजनी गटात सहभागी होतात.
तर महिला ४१ किलो, ४५ किलो, ५० किलो, ५५ किलो, ६१ किलो, ६७ किलो, ७३ किलो, ७९ किलो, ८६ किलो आणि ८६ किलोपेक्षा जास्त वजनी गटात सहभागी होतात.