Swapnil Kusale Welcome Pune : ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत, पाहा-paris olympics bronze medalist swapnil kusale warm welcome at the pune airport new delhi ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Swapnil Kusale Welcome Pune : ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत, पाहा

Swapnil Kusale Welcome Pune : ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत, पाहा

Aug 08, 2024 01:27 PM IST

स्वप्नील कुसाळेचं ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.

Swapnil Kusale Welcome Pune : ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत, पाहा
Swapnil Kusale Welcome Pune : ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळेचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत, पाहा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसळे भारतात परतला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये स्वप्नीलने ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने अंतिम फेरीत ४५१.४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नील भारतात पोहोचल्यावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे विमानतळाचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे, जिथे त्याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

वास्तविक, एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा स्वप्नील कुसळे भारतात परतल्याचे दिसत आहे. स्वप्नील कुसाळेचे पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येत असून, गळ्यात फुलांचा हार घालून पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

स्वप्नील कुसळेनं असं जिंकलं कांस्य पदक

फायनलमध्ये स्वप्नील कुसळे पहिल्या स्टँडिंग सीरीजनंतर चौथ्या स्थानावर होता. यानंतर नीलिंगमध्ये त्याचा पहिला शॉट ९.६ असा होता पण नंतर त्याने शानदार पुनरागमन केले. यानंतर, तो १०.६ आणि १०.३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला, परंतु पुढील दोन शॉट्स ९.१ आणि १०.१ असे होते, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला.

स्वप्नीलने दमदार पुनरागमन करत चमत्कार घडवला

त्यानंतर १०.३ गुण मिळवून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि शेवटपर्यंत कायम राहिला. नीलिंग पोजिशननंतर तो सहाव्या स्थानावर होता पण प्रोननंतर तो पाचव्या स्थानावर आला.

गेल्या १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या कुसळेला ऑलिम्पिक पदार्पणासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीइतकाच 'कूल' असलेल्या कुसळेने क्रिकेट विश्वचषक विजेत्या कर्णधारावर आधारित चित्रपट अनेकदा पाहिल्याचे सांगितले.