Olympics 2024 : ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास संपला, या खेळाडूंनी जिंकली पदकं, सुवर्ण पदकाविना 'पॅरिस'वारी फेल-paris olympics 2024 india medal tally 6 medals no gold manu bhaker neeraj chopra vinesh phogat hockey sarbjot singh ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Olympics 2024 : ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास संपला, या खेळाडूंनी जिंकली पदकं, सुवर्ण पदकाविना 'पॅरिस'वारी फेल

Olympics 2024 : ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास संपला, या खेळाडूंनी जिंकली पदकं, सुवर्ण पदकाविना 'पॅरिस'वारी फेल

Aug 11, 2024 03:03 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदके जिंकली आहेत. यामध्ये ५ कांस्य आणि एका रौप्यपदकांचा समावेश आहे. कुस्तीपटू विनेश फोगटच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला तरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची मोहीम सुवर्ण पदकाविना संपणार हे आता निश्चित झाले आहे.

ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास संपला, या खेळाडूंनी जिंकली पदकं, सुवर्ण पदकाविना 'पॅरिस'वारी फेल
ऑलिम्पिकमधला भारताचा प्रवास संपला, या खेळाडूंनी जिंकली पदकं, सुवर्ण पदकाविना 'पॅरिस'वारी फेल (Doordarshan Sports- X)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताची मोहीम संपली आहे. भारताची कुस्तीपटू रितिका हुड्डा ७६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली. यानंतर सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचा प्रवास संपला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात केवळ ६ पदकं

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सहा६ पदके जिंकली आहेत. यामध्ये ५ कांस्य आणि एका रौप्यपदकांचा समावेश आहे. भालाफेकीत एक रौप्यपदक आले. तर नेमबाजीत तीन कांस्यपदके जिंकली, तर कुस्ती आणि हॉकीमध्ये भारताने प्रत्येकी १ कांस्यपदक जिंकले.

मात्र, कुस्तीपटू विनेश फोगटच्या बाबतीत निर्णय भारताच्या बाजूने आल्यास पदकांची संख्या नक्कीच ७ होईल. विनेशच्या प्रकरणाचा निर्णय काहीही असो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही हे स्पष्ट झाले आहे.

सुवर्णपदकाशिवाय ऑलिम्पिक मोहीम फेल

भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीमध्ये पहिले पदक मिळाले, जेव्हा मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. सरबज्योत सिंग हा तिच्यासोबत या संघात होता.

यानंतर स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक आणि भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले. यानंतर कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकले.

टोकियो ऑलिम्पिक (२०२०) मध्ये भारताने एक सुवर्णपदकासह ७ पदके जिंकली होती, जी ऑलिम्पिक इतिहासातील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. अशा स्थितीत यावेळी भारताची पदकतालिका दुहेरी अंकात पोहोचेल, अशी अपेक्षा होती. पण जे घडले ते अपेक्षेविरुद्ध होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही आणि पदकांची संख्या ६ वरच अडकली.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताचे पदक विजेते

मनू भाकर- कांस्यपदक, नेमबाजी

मनू भाकर/सरबज्योत सिंग – कांस्य पदक, नेमबाजी

स्वप्नील कुसळे – कांस्यपदक, नेमबाजी

भारतीय हॉकी संघ - कांस्य पदक

नीरज चोप्रा- रौप्य पदक, ऍथलेटिक्स

अमन सेहरावत- कांस्यपदक, कुस्ती

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशातील एकूण ११२ खेळाडूंनी १६ खेळांमधील एकूण ६९ पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला. यासोबतच ५ राखीव खेळाडूही पॅरिसला गेले. मात्र, भारताला नेमबाजी, ॲथलेटिक्स, हॉकी आणि कुस्तीमध्येच पदके जिंकता आली.

तसे पाहिले तर भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ४१ पदके जिंकली आहेत. यापैकी फक्त नेमबाज अभिनव बिंद्रा (२००८) आणि नीरज चोप्रा (२०२१) यांनी वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली आहेत.े