पॅरिसऑलिम्पिक मधून भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याआधी भारताचे पुरुष खेलाडू या प्रकारात क्वालीफायर फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. मनू भाकरने जोरदार प्रदर्शन करत अचूक निशाणा साधत पदकावर दावा ठोकला. टॉप ८ मध्ये राहणाऱ्या नेमबाजांना अंतिम फेरीत स्थान मिळते. एकूण ५८० अंकांसह मनूने तिसऱ्या स्थानावर रहात अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. उद्या (रविवार) दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्टल इव्हेंटच्या सुरुवात जबरदस्त करत पहिल्या तीन सीरीजनंतर दुसऱ्या नंबरवर पोहोचली. तसेच भारताची आणखी एक नेमबाज रिदिमा सांगवान २४ व्या स्थानी घसरली. चौथ्या सीरीजनंतर मनू तिसऱ्या स्थानी पोहोचली. पहिल्या तीन सीरीजमध्ये तिने ९७, ९७, ९८ स्कोर केला होता, तर चौथ्या सीरीजमध्ये ९६ स्कोर केला. रिदिमा सांगवानने पुनरागमन करत २४ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर पोहोचली.मात्र,ती अंतिम फेरीत पात्र ठरू शकली नाही.
२० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथेझालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
अंकिता भकत पश्चिम बंगालतील कोलकाता येथील चिडिया मोडमध्ये वास्तव्यास आहे. अंकिताची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, ती धारीवर धनुष्यबाण घेऊन सराव करायची. कारण, नवीन धनुष्यबाण खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये लागतात. २६ वर्षीय अंकिता लहानपणापासूनच तिरंदाजीच्या प्रेमात पडली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने कोलकाता तिरंदाजी क्लबमध्ये प्रशिक्षण सुरू केले. यानंतर ती जमशेदपूरच्या तिरंदाजी अकादमीत गेली. सुमारे १० वर्षांपूर्वी तिची टाटा आर्चरी अकादमीमध्ये निवड झाली, यानंतर तिचे आयुष्य बदलले.
अंकिताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी आशियाई खेळ २०२३ मध्ये महिलांच्या सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपली प्रतिभा दाखवली. सिमरनजीत कौर आणि भजन कौर यांच्या टीममध्ये तिचा समावेश होता.