Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला

Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला

Aug 02, 2024 02:07 PM IST

खलिफला २०२४ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी खुद्द आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने परवानगी दिली होती. पण राऊंड ऑफ १६ मध्ये जेव्हा तिचा सामना इटलीच्या अँजेला कॅरिनीशी झाला तेव्हा अँजेलाने या सामन्यातून माघार घेणेच योग्य मानले.

Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला
Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला (X)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून एक विचित्र घटना समोर आली आहे. स्वत:ला महिला म्हणवणारी अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ वादात सापडली आहे. कारण तिच्या डीएनए टेस्टमध्ये ती पुरूष असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, खलिफला २०२४ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी खुद्द आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने परवानगी दिली होती. पण राऊंड ऑफ १६ मध्ये जेव्हा तिचा सामना इटलीच्या अँजेला कॅरिनीशी झाला तेव्हा अँजेलाने या सामन्यातून माघार घेणेच योग्य मानले.

वास्तविक, महिलांच्या ६६ किलो वजनी गटाच्या लढतीत अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ आणि इटलीची बॉक्सर अँजेला कारिनी आमनेसामने आल्या. पण गुरुवारी झालेला राउंड ऑफ १६ फेरीतील हा सामना केवळ ४६ सेकंदच चालला. या काळात इटालियन फायटर दोनदा तिच्या कोपऱ्यात जाताना दिसली. सर्वप्रथम, जोरदार पंच सहन केल्यानंतर, ती तिच्या हेडगियरची दुरुस्ती करण्यासाठी कोपऱ्यात गेली, तर दुसरा पंच बसल्यानंतर तिने या लढतीतून आपले नाव मागे घेतले.

इलॉन मस्क यांनीही यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली असून अशा खेळाडूंना खेळण्याची संधीही देऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

अँजेला कॅरिनी रडू लागली

एंजेला कॅरिनीने तिच्या परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले, "मी लढण्यासाठी रिंगमध्ये गेले होते, मी हार मानली नाही, परंतु एका पंचनंतर मला खूप वेदना होऊ लागल्या. म्हणून मी ठरवलं, ' आता आणखी नाही...'

खलिफने ६६ किलो वजनी गटाच्या पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, परंतु तिच्या विजयाने मोठ्या वादाला तोंडफोडले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना हंगेरीच्या लुका हॅमोरीशी होणार आहे.

डीएनए चाचणीत पुरुष घोषित करण्यात आले

गेल्या वर्षी इमान खलीफ ही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (IBA) घेतलेल्या लिंग चाचणीत नापास झाली होती. या कारणास्तव तिला २०२३ च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी अपात्र ठरवण्यात आले.

आयबीएचे अध्यक्ष ओमर क्रेमलेव्ह यांनी त्यावेळी सांगितले होते की, अनेक खेळाडू महिला म्हणून खेळात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तपासणीत त्याच्या डीएनएमध्ये एक्सवाय गुणसूत्र असल्याचे आढळून आले.

अशा खेळाडूंना गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून वगळण्यात आले होते, परंतु तरीही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने इमान खलिफला येथे खेळण्याची परवानगी दिली.

Whats_app_banner