Paris Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज तीन पदकं मिळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज तीन पदकं मिळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympics Day 3 Schedule : भारतीय नेमबाज कमाल करणार, भारताला आज तीन पदकं मिळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Jul 29, 2024 11:13 AM IST

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आज नेमबाजीत दोन पदकं जिंकण्याची संधी आहे. रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांच्याकडून भारतीय चाहत्यांना पदकाच्या आशा असतील.

Paris Olympics Day 3 Schedule : आज भारताला तीन पदकांची अपेक्षा, असं आहे वेळापत्रक, पाहा
Paris Olympics Day 3 Schedule : आज भारताला तीन पदकांची अपेक्षा, असं आहे वेळापत्रक, पाहा

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी (२८ जुलै) भारताने पदकाचे खाते उघडले. महिला नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कांस्य पदकाची कमाई केली.  यानंतर आता आज तिसऱ्या दिवशी (२९ जुलै) नेमबाजीतच भारताला आणखी पदकं मिळण्याची अपेक्षा आहे.

रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांच्याकडून भारतीय चाहत्यांना पदकाच्या आशा असतील. तसेच, आज तिरंदाजीतही पुरुष संघावर (तरुणदीप रॉय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव) नजर आहे. पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर तो पदकाच्या फेरीत प्रवेश करेल.

रमिता-बबुता यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा 

रमिता पाचव्या स्थानावर राहून महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली, तर अर्जुन बाबुताने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सातवे स्थान मिळवून पात्रता मिळवली. आता तिसऱ्या दिवशी या दोन्ही नेमबाजांकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे.

रमिता जिंदालचा सामना आज दुपारी १ वाजत तर अर्जुन बाबुता दुपारी ३:३० वाजेनंतर अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

यानंतर आज भारतीय पुरुष हॉकी संघ गट टप्प्यातील दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे, तर बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपटूही आज दम दाखवतील. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजचे वेळापत्रक 

बॅडमिंटन

- पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (दुपारी १२ )

- महिला दुहेरी (ग्रुप स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (दुपारी १२:५० नंतर)

- पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेजी (सायंकाळी ५:३० नंतर)

शूटिंग

- १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग चीमा (दुपारी १२:४५ पासून)

- पुरुष ट्रॅप पात्रता: पृथ्वीराज तोंडैमन (दुपारी 1:00 वाजेपासून)

- १० मीटर एअर रायफल महिला अंतिम फेरी: रमिता जिंदाल (दुपारी १:०० नंतर)

- १० मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बाबुता (दुपारी ३:३० नंतर)

हॉकी

- पुरुषांचा पूल ब सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना (४:१५ PM IST)

धनुर्विद्या

- पुरुष सांघिक उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव (सायंकाळी ६.३० पासून)

टेबल टेनिस

- महिला एकेरी (राउंड ऑफ ३२): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (रात्री ११:३० नंतर)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग