Paris Olympics 2024 : ऐतिहासिक दिवस! भारताच्या झोळीत आज ४ सुवर्णपदकं पडणार? सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics 2024 : ऐतिहासिक दिवस! भारताच्या झोळीत आज ४ सुवर्णपदकं पडणार? सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर

Paris Olympics 2024 : ऐतिहासिक दिवस! भारताच्या झोळीत आज ४ सुवर्णपदकं पडणार? सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर

Aug 07, 2024 09:47 AM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा १२ वा दिवस आहे. हा दिवस भारतासाठी खूप खास असू शकतो. आज भारताच्या खात्यात एकूण ४ सुवर्णपदके येणे अपेक्षित आहे.

paris olympics 2024 day 12 indias schedule : ऐतिहासिक दिवस! भारताच्या झोळीत आज ४ सुवर्णपदकं पडणार? सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर
paris olympics 2024 day 12 indias schedule : ऐतिहासिक दिवस! भारताच्या झोळीत आज ४ सुवर्णपदकं पडणार? सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज बुधवारी (७ ऑगस्ट) १२वा दिवस आहे. भारतासाठी ११ वा दिवस खूपच मनोरंजक ठरला. या दिवशी भारताच्या पदरी निराशेसोबत यशदेखील पडले. हॉकी संघाला उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. याशिवाय नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.

आता आज बुधवारी म्हणजेच १२व्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण ४ सुवर्णपदके येणे अपेक्षित आहे. सुवर्णपदकासाठी सर्वांच्या नजरा विनेश फोगटवर असतील.

कुस्तीशिवाय भारताला आज ३००० मीटर स्टीपलचेस, मॅरेथॉन वर्ल्ड मिक्स्ड रिले फायनल आणि वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळू शकते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये दम दाखवताना दिसणार आहे.

याशिवाय अविनाश साबळे ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये दिसणार आहे. अविनाश ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला. तर मॅरेथॉन वर्ल्ड मिक्स्ड रिलेच्या अंतिम फेरीत प्रियांका आणि सूरज पंवार ही जोडी मैदानात उतरणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक ७ ऑगस्टचे वेळापत्रक

अ‍ॅथलेटिक्स

मिश्र मॅरेथॉन रेसवॉक रिले - सूरज पनवार-प्रियांका गोस्वामी - ११:०० am

पुरुषांची उंच उडी पात्रता - सर्वेश कुशारे - दुपारी १:३५ वा

महिलांची १०० मीटर अडथळा फेरी १ - ज्योती याराजी - दुपारी १:४५ वा.

महिला भालाफेक पात्रता - अन्नू राणी - दुपारी १:५५ वा

पुरुषांची तिहेरी उडी पात्रता - अब्दुल्ला अबुबकर आणि प्रवीण चित्रवेल - रात्री १०:४५

पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस फायनल - अविनाश साबळे - मध्यरात्री १:१३.

गोल्फ

महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले फेरी १ - अदिती अशोक आणि दीक्षा डागर - दुपारी १२:३० वा.

टेबल टेनिस

महिला संघ (श्रीजा अकुला, मनिका बत्रा अर्चना कामथ) उपांत्यपूर्व फेरी - टीम इंडिया विरुद्ध जर्मनी - दुपारी १:३० वाजता.

वेट लिफ्टिंग

महिला ४९ किलो - मीराबाई चानू - रात्री ११:०० वा.

कुस्ती

महिला फ्रीस्टाइल ५३ किलो राउंट ऑफ १६ - अंतिम पंघल विरुद्ध झेनेप येतगिल - दुपारी २:३०

महिला फ्रीस्टाइल ५३ किलो उपांत्यपूर्व फेरी (पात्रतेवर आधारित) - दुपारी ४:२०

महिला फ्रीस्टाइल ५३ किलो सेमीफायनल (पात्रतेवर आधारित) - रात्री १०:२५

महिला फ्रीस्टाइल ५० किलो सुवर्णपदक सामना - विनेश फोगट विरुद्ध सारा ॲन हिल्डब्रँड - मध्यरात्री १२:३०.

Whats_app_banner