पुन्हा-पुन्हा पाहाल असा व्हिडीओ… गोल्ड मेडलिस्ट खेळाडूला भर मैदानात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज-paris olympics 2024 china badminton player huang yaqiong got proposal from liu yuchen after wining gold medal see video ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पुन्हा-पुन्हा पाहाल असा व्हिडीओ… गोल्ड मेडलिस्ट खेळाडूला भर मैदानात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

पुन्हा-पुन्हा पाहाल असा व्हिडीओ… गोल्ड मेडलिस्ट खेळाडूला भर मैदानात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

Aug 03, 2024 02:31 PM IST

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये एक खूप वेगळे गोड दृश्य पाहायला मिळाले. सुवर्णपदक जिंकणाऱ्या एका चीनच्या महिला खेळाडूला बॅडमिंटन कोर्टवरच लव्ह प्रपोजल आले

paris olympics 2024 : पुन्हा-पुन्हा पाहाल असा व्हिडीओ… गोल्ड मेडलिस्ट खेळाडूला भर मैदानात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज
paris olympics 2024 : पुन्हा-पुन्हा पाहाल असा व्हिडीओ… गोल्ड मेडलिस्ट खेळाडूला भर मैदानात बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

ऑलिम्पिक गेम्स २०२४ पॅरिस येथे होत आहेत. पॅरिसला 'प्रेमाचे शहर' असेही म्हणतात. आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्यासाठी या शहरापेक्षा चांगलं ठिकाण आणखी कोणतं असेल!

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन कोर्टमध्ये एक अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळाले, सुवर्णपदक विजेती चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या क्योन्ग हिला तिचा प्रियकर लियू यू चेनने प्रपोज केले. या रोमँटिक क्षणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

खरं तर, शुक्रवारी (२ ऑगस्ट) चीनच्या हुआंग याकिओंगने बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत झेंग सिवेई हिच्यासह सुवर्णपदक जिंकले. या विजयानंतर लगेच हुआंग याकिओंगला तिचा प्रियकर लियू युचेनने बॅडमिंटन कोर्टवर प्रपोज केले. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की लियू युचेन प्रथम गर्लफ्रेंड हुआंग याकिओंगला पुष्पगुच्छ देतो आणि नंतर गुडघ्यावर बसतो आणि अंगठीसह तिला प्रपोज करतो. प्रियकराच्या या कृतीनंतर हुआंग याकिओंग हिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, तिने प्रपोजल स्विकारले आणि नंतर लिऊ युचेनला मिठी मारली.

हुआंग याकिओंग आश्चर्यचकित झाली

लियू युचेन याची ही कृती पाहिल्यानंतर हुआंग याकिओंग पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. तिला अशा प्रकारच्या घटनेची अपेक्षा नव्हती. हुआंग म्हणाला, "हे प्रपोज माझ्यासाठी आश्चर्यकारक होते कारण मी माझ्या तयारीवर लक्ष केंद्रित करत होते. मी ऑलिम्पिक चॅम्पियन आहे आणि मला लग्नाचे प्रपोजल आले जे अपेक्षित नव्हते.

कोरियन संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले

चीनच्या हुआंग याकिओंग आणि झेंग सिवेई यांच्या मिश्र संघाने दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जेओंग ना युन यांचा २१-८, २१-११ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.