मराठी बातम्या  /  Sports  /  Pakistani Media Support Virat Kohli In Controversy With Naveen Ul Haq In Lsg Vs Rcb Ipl 2023

Kohli Naveen Fight : पाकिस्तानी मीडियाकडून विराट कोहलीची पाठराखण, व्हिडिओ शेयर करत नवीनची पोलखोल

Naveen and Virat Controversy
Naveen and Virat Controversy (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 02, 2023 07:26 PM IST

Naveen and Virat Controversy : आयपीएलमध्ये विराट कोहली आणि लखनौचा गोलंदाज नवीन उल-हक यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्यावर पाकिस्तानातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Kohli Naveen Ul Haq Fight In IPL 2023 : आयपीएलमध्ये सोमवारी आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल-हक यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. सामना सुरू असताना आणि सामना संपल्यानंतरही दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता अनेकांनी विराट कोहलीचं समर्थन करत नवीन उल-हकला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता पाकिस्तानी मीडियानेही विराट कोहलीला पाठिंबा देत नवीन हा भांडखोर खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलमधील कालच्या सामन्यात झालेल्या वादावादीची पाकिस्तानी मीडियातही जोरदार चर्चा होत आहे. पाकिस्तानमधील एका क्रिकेट वेबसाइटने नवीन उल-हकचे जूने व्हिडिओ शेयर करत त्याचं नेहमीच वर्तन चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय श्रीलंका प्रीमियर लीग आणि पीएसएलमध्येही नवीन उल-हकने घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्यात नवीन उल-हकने शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर यांच्यासोबत वाद घातल्याचा हवाला देण्यात आला आहे. भारतातील अनेक लोक कोहलीचं समर्थन करत असताना पाकिस्तानी मीडियानेही विराट कोहलीला पाठिंबा दिल्यामुळं नवीन उल-हकच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक हा केवळ आयपीएलच खेळत नाही. तर तो पाकिस्तान सुपर लिग आणि लंका प्रीमियर लीगमध्येही खेळतो. या दोन्ही लिगमध्ये त्याने पाकिस्तानी आणि श्रीलंकन खेळाडूंशी हुज्जत घातली होती. लंका प्रिमियर लिगमध्ये नवीन उल-हक आणि श्रीलंकेच्या थिसारा परेरा यांच्या जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळं आता तिन्ही लिग क्रिकेटमध्ये नवीन उल-हकने राडा केल्यामुळं त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

WhatsApp channel