मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIRAL VIDEO : उर्वशी रौतेलाबाबात पाकिस्तानी बॉलर नसीम शाहचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...

VIRAL VIDEO : उर्वशी रौतेलाबाबात पाकिस्तानी बॉलर नसीम शाहचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 10, 2022 07:55 PM IST

Naseem Shah On Urvashi Rautela : पाकिस्तानी बॉलर नसीम शाहला बॉलिवून अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यानं थेट आणि मजेशीर उत्तर दिलं आहे.

Naseem Shah On Urvashi Rautela
Naseem Shah On Urvashi Rautela (HT)

Pakistani Bowler Naseem Shah On Urvashi Rautela : आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या काही सामन्यांना बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती. भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही ती स्टेडियममध्ये दिसली. परंतु आता पाकिस्तानी बॉलरनं तिच्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर दिल्यानं ती पुन्हा चर्चेत आली आहे. उर्वशीनं क्रिकेट सामना झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली होती. ज्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दिसत होता. त्यामुळं त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु अखेर त्यानं याबाबत पाळलेलं मौन सोडलं आहे.

१९ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाज नसीमला जेव्हा एका पत्रकार परिषदेत उर्वशी रौतेलाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो हसायला लागला. आणि उत्तर देताना म्हणाला की, मला उर्वशी रौतेला कोण आहे? हे माहिती नाहीये. सध्या माझं लक्ष केवळ आशिया कपमधील सामन्यांवर आहे. असे अनेक व्हिडिओज लोक पाठवत असतात. त्यामुळं माझं लक्ष केवळ क्रिकेटवर असल्याचं तो म्हणाला.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी बॉलर नसीम शाहचं नाव उर्वशी रौतेला शिवाय सुरभी ज्योतीसोबतही जोडलं जात आहे. सुरभीनं काही दिवसांपूर्वी नसीम शाह विषयी केलेलं ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यामुळं आता नसीम शाह च्या प्रेमप्रकरणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली आहे.

WhatsApp channel