मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवावर इम्रान खान यांची प्रतिक्रिया, संघाचे केले कौतुक

T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवावर इम्रान खान यांची प्रतिक्रिया, संघाचे केले कौतुक

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 14, 2022 09:38 AM IST

T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संघाच्या कामगिरीचे, विशेषत: गोलंदाजांचे कौतुक केले.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (REUTERS)

T20 World Cup: टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केलं. या सामन्यात कमी धावांचे आव्हान दिल्यानंतरही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सामना १९ व्या षटकापर्यंत नेला. मात्र अखेर इंग्लंडने बाजी मारली. पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संघाच्या कामगिरीचे, विशेषत: गोलंदाजांचे कौतुक केले.

इम्रान खान यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात इम्रान खान यांनी म्हटलं की, जगातील सर्वोत्तम असे वेगवान गोलंदाज पाकिस्तानकडे आहेत. ते आणखी चांगली कामगिरी करतील आणि देशाला भविष्यात विजय मिळवून देतील.

अंतिम सामना झाला आहे. मला या गोष्टीची माहिती आहे की देशातील लोकांना सध्या पाकिस्तानच्या पराभवामुळे धक्का बसला आहे. पण जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. हे होतच राहतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला संघ अखेरपर्यंत लढला असंही इम्रान खान यांनी म्हटलं.

इम्रान खान म्हणाले की, मी नेहमीच सांगतो की संघाने अखेरपर्यंत लढलं पाहिजे. हेच आपल्या संघाने केलं. सामन्यात संघाने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला. शाहीन आफ्रिदी जखमी झाला. तो चांगला खेळत होता. संघाने ज्या पद्धतीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली त्यासाठी अभिनंदन.

WhatsApp channel

संबंधित बातम्या