मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wahab Riaz Minister : अरे वाह! वहाब रियाझला चालू स्पर्धेत मिळाली क्रिडा मंत्रालयाची जबाबदारी

Wahab Riaz Minister : अरे वाह! वहाब रियाझला चालू स्पर्धेत मिळाली क्रिडा मंत्रालयाची जबाबदारी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 02:30 PM IST

wahab riaz became sports minister of punjab : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझवर मोठी जबाबदारी आली आहे. त्याची पंजाबचा काळजीवाहू क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Wahab Riaz Sports Minister
Wahab Riaz Sports Minister

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझवर मोठी जबाबदारी आली आहे. वहाब रियाझला पाकिस्तानच्या पंजाब राज्याचे क्रीडा मंत्री बनवण्यात आले आहे. वहाब सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यामुळे तो आताच शपथ घेणार नाही. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, वहाब रियाझ पाकिस्तानात येताच क्रीडा मंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

विशेष म्हणजे, वहाबने २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी, २०२० पासून त्याला एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय खेळण्याची संधीही मिळालेली नाही. वहाबने पाकिस्तानसाठी २७ कसोटी, ९१ वनडे आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत ८३, एकदिवसीय सामन्यांत १२० आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये ३४ विकेट्स घेतल्या आहेत.

टी-20 मध्ये ४०० विकेट घेणारा वहाब हा सहावा गोलंदाज

वहाब रियाझने नुकतीच टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली होती. काही दिवसांपूर्वी टी-20 फॉरमॅटमध्ये ४००  विकेट घेणारा तो जगातील सहावा गोलंदाज ठरला होता. वहाब व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नरेन, अफगाणिस्तानचा राशिद खान, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि इमरान ताहिर यांनी टी-२० मध्ये ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच PCB च्या निवड समितीला सुनावले होते खडेबोल

अलीकडच्या काळात, वहाब रियाझने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीवर टीका केली होती. टी-२० वर्ल्डकप २०२२ साठी निवडलेली टीम सुंतलित नव्हती, असे वहाबचे म्हणणे होते. त्याच्या मते, शोएब मलिक, इमाद वसीम, सरफराज अहमद यांना वर्ल्डकपसाठी संघात असायला हवे होते.

विशेष म्हणजे इमाद वसीम आणि शोएब मलिक यांनी २०२१ च्या T20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती, परंतु असे असतानाही या दोघांना स्पर्धेनंतर संघातून वगळण्यात आले होते. त्यावर वहाबने प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची कामगिरी लॅपटॉपवर का दिसत नाही? २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात त्यांच्याकडे दुर्लक्ष का झाले? त्याचा काय दोष होता? असे प्रश्न वहाबने उपस्थित केले होते.

 

WhatsApp channel