पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतण्याची तयारी सुरू केली आहे. दुखापतीमुळे शाहीन गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. मात्र, आता त्याने पाकिस्तान सुपर लीगमधून पुनरागमन करण्याची तयारी सुरू केली आहे.
अशातच शाहीन आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याचा भावी सासरा शाहिद आफ्रिदीला गोलंदाजी करताना दिसत आहे. शाहीन आणि शाहिद दोघेही ओपन नेट प्रॅक्टिस करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान शाहिदने शाहीनच्या चेंडूवर काही उत्कृष्ट शॉट्सही मारले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
शाहिद आफ्रिदी सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा अंतरिम अध्यक्ष आहे. मात्र, लवकरच तो हे पद सोडणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. तर शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळतो आणि संघाचा कर्णधारही आहे.
शाहीनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आतापर्यंत एकूण २५ कसोटी, ३२ एकदिवसीय आणि ४७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये शाहीनने ९९ विकेट्स घेतल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६२ आणि टी-20 मध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या