- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी शोएबला संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याने स्वता:च्या हाताची नस कापली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
पाकिस्तान क्रिकेटमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान न मिळाल्याने एका क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शोएब असे या क्रिकेटरचे नाव आहे. पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादचा हा क्रिकेटपटू आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी शोएबला संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याने स्वता:च्या हाताची नस कापली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. शोएब हा वेगवान गोलंदाज आहे.
कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "चॅम्पियनशिपच्या निवड चाचणीनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही, त्यानंतर आलेल्या नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. काही वेळाने तो आम्हाला त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये सापडला. त्याने स्व:ताचे मनगट कापलेले होते. तो बेशुद्ध होता. त्यानंतर आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत". सध्या शोएबची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये कराचीचा अंडर-१९ क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने संघातून वगळल्यानंतर घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
संबंधित बातम्या
Sara Tendulkar: सचिनची लेक साराचं ग्लॅमरस फोटोशुट
June 22 2022