मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Babar Azam New Jersey: पाकिस्तानच्या नव्या जर्सीमुळं बाबर आझम ट्रोल, चाहत्यांनी पाडला मीम्सचा पाऊस
babar azam
babar azam

Babar Azam New Jersey: पाकिस्तानच्या नव्या जर्सीमुळं बाबर आझम ट्रोल, चाहत्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

19 September 2022, 10:44 ISTRohit Bibhishan Jetnavare

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. बाबर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीत दिसत आहे. या जर्सीच्या डिझाइनवरुन बाबर ट्रोल होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप त्यांच्या नव्या जर्सीबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची नवीन जर्सी जारी करण्यात आली. टीम इंडियाची नवी जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह महिला क्रिकेट संघातील खेळाडू नवीन जर्सीत पोज देताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या दरम्यनान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बाबर एका नव्या जर्सीमध्ये दिसत आहे. या फोटोवरुन चाहते बाबरला आणि PCB ला प्रचंड ट्रोल करत आहेत.

विशेष म्हणजे, पीसीबीने आतापर्यंत त्यांच्या नवीन किटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टीम इंडियाची नवी जर्सी लाँच

भारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. त्याचवेळी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची नवी जर्सी रविवारी( १८ सप्टेबर) लाँच करण्यात आली. या संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संघाची ही नवीन जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीमध्ये तीन स्टार आहेत. त्याचवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मासह महिला क्रिेकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा हे खेळाडू या जर्सीत पोज देताना दिसत आहेत. भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

जर्सीतील थ्री स्टार तीन वर्ल्डकप जिंकल्याची निशाणी

भारतीय संघाच्या नवीन जर्सीमध्ये तीन स्टार आहेत. हे थ्री स्टार भारतीय संघाने तीन वेळा जगज्जेतेपद पटकावल्याची ही निशाणी आहे. वास्तविक, भारतीय संघाने १९८३ मध्ये वनडे वर्ल्डकप, २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता.