मराठी बातम्या  /  Sports  /  Pak Vs Nz 2nd Odi Aleem Dar Identified Mismeasurement Of 30 Yard Circle After First Over In 2nd Odi

PAK vs NZ ODI : आता हेच पहायचं राहिल होत! सामना थांबवून पंच अलीम दार यांनी दुरुस्त केलं सर्कल

pak vs nz 2nd odi
pak vs nz 2nd odi (twitter viral)
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Apr 29, 2023 09:47 PM IST

pak vs nz 2nd odi : पाकिस्तान क्रिकेटच्या एका चुकीमुळे जगभर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. अंपायर (aleem dar 30 yard circle) अलीम दार यांनी ही चूक ओळखली आणि दुरुस्त केली.

पाकिस्तान विचित्र देश आहे. एकीकडे ते आशिया चषक आणि आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यासाठी भांडत असतात आणि दुसरीकडे ते सामन्याच्या साध्या आणि मूलभूत नियमांकडे लक्ष देत नाहीत. आज शनिवारी (२९ एप्रिल) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात एक विचित्र घटना घडली. पाकिस्तान क्रिकेटच्या एका चुकीमुळे जगभर त्यांची खिल्ली उडवली जात झाली.

ट्रेंडिंग न्यूज

30 यार्ड सर्कल चुकीचे

सामन्याचे पहिले षटक टाकल्यानंतर ३० यार्डच्या सर्कल चुकीचे असल्याचे आढळून आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली होती, या कारणामुळे असे घडल्याचे सांगण्यात आले काही. पीच नवीन तयार केली परंतु ३०-यार्ड सर्कल तेच ठेवण्यात आले होते. मैदानावरील पंच अलीम दार यांना ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ कारवाई केली. दुसऱ्या षटकाच्या आधी पाऊलांच्या साह्याने सर्कल मोजण्यात आले आणि त्याचा आकार ठरवण्यात आला. अशाप्रकारे वर्तुळाचे मोजमाप करण्यात सुमारे ६ मिनिटांचा वेळ वाया गेला.

अलीम दार यांनी पकडली चुक

अंपायर अलीम यांनी अलीकडेच आयसीसीच्या एलिट पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिट पॅनेलचे अंपायर म्हणून दार यांना काही दिवसांपूर्वीच सन्मानित करण्यात आले. पिंडी क्रिकेट स्टेडियमवर आयसीसीच्या सत्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५४ वर्षीय अंपायर दार यांनी मार्चमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा एकूण ४३५ सामन्यांमध्ये काम केल्यानंतर हे पद सोडले होते. पण, ते अजूनही पाकिस्तानमध्ये घरच्या सामन्यांमध्ये कामगिरी करू शकतात. पंचांच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये स्थान मिळाल्यास त्यांना दौऱ्यावरही जावे लागू शकते.

सामन्यात काय घडलं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडने घेतला. त्यांनी ५० षटकांत पाच गडी गमावून ३३६ धावा केल्या. चॅड बोवेसने ५१, डॅरिल मिशेलने १२९ आणि कर्णधार टॉम लॅथमने ८५ चेंडूत ९८ धावा केल्या.

पाकिस्तानकडून हरिस रौफने १० षटकात ७८ धावा देत ४ बळी घेतले. तर नसीम शाहला एक विकेट मिळाली. हे वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानने १६ षटकात १ बाद ९३ धावा केल्या आहेत. फखर जमान ५६ आणि बाबर आझम १० धावांवर खेळत आहेत.

WhatsApp channel