मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs AFG : पाक-अफगाणिस्तान मालिकेसाठी विचित्र निर्णय, दोन्ही देशांच्या प्रेक्षकांना वेगळं बसवणार

PAK vs AFG : पाक-अफगाणिस्तान मालिकेसाठी विचित्र निर्णय, दोन्ही देशांच्या प्रेक्षकांना वेगळं बसवणार

Mar 14, 2023 12:32 PM IST

PAK vs AFG T20 series schedule : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात २५ मार्चपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांचे चाहते वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसतील.

PAK vs AFG T20
PAK vs AFG T20

pakistan& afghanistan fans will sit separate in stands : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात २५ मार्चपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये अफगाणिस्तान संघाचे अनेक खेळाडू खेळत आहेत. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये खूप प्रेम असते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनतात.

ट्रेंडिंग न्यूज

आता हेच लक्षात घेऊन टी-20 मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान टी-२० सामन्यांदरम्यान दोन्ही संघांचे चाहते एकाच ठिकाणी बसणार नाहीत. दोन्ही देशांच्या प्रेक्षकांची वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातली ही टी-20 मालिका शारजाहमध्ये खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांना बसण्यासाठी स्वतंत्र स्टँड असतील. यापूर्वी सामन्यादरम्यान मैदानावरील खेळाडूंशिवाय स्टँडमधील चाहतेदेखील एकमेकांना भिडल्याचे दिसले आहे. २०२२ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले होते. त्या सामन्याच्या आधी मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर स्टँडमध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडणार

कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोन्ही संघांचे प्रेक्षक वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसलेले पाहायला मिळतील. तीन सामन्यांच्या या मालिकेत चांगलीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी शादाब खान पाकिस्तानची धुरा सांभाळणार आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना - शारजाह क्रिकेट स्टेडियम (२५मार्च, शुक्रवार)

पहिला टी-20 सामना - शारजाह क्रिकेट स्टेडियम (२७ मार्च, सोमवार)

पहिला टी-20 सामना - शारजाह क्रिकेट स्टेडियम (२९ मार्च, बुधवार)

T20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ

शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, जमान खान, तैयब ताहिर, शान मसूद, सॅम अयुब.

WhatsApp channel

संबंधित बातम्या