मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ऑलिम्पिक धावपटू ऑस्कर पिस्टोरियस जेलमधून सुटला, व्हॅलेंटाईन डेला केली होती प्रेयसीची हत्या

ऑलिम्पिक धावपटू ऑस्कर पिस्टोरियस जेलमधून सुटला, व्हॅलेंटाईन डेला केली होती प्रेयसीची हत्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 05, 2024 08:05 PM IST

Oscar Pistorius Released On Parole : ऑस्कर पिस्टोरियसने २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्प हिची हत्या केली होती. पिस्टोरियसने १४ फेब्रुवारी २०१३ च्या पहाटे स्टीनकॅम्पला टॉयलेटच्या दारातून गोळ्या घालून ठार केले.

Oscar Pistorius On Parole
Oscar Pistorius On Parole

दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पिक खेळाडू ऑस्कर पिस्टोरियस याची पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सुधारणा विभागाने शुक्रवारी (५ जानेवारी) ही माहिती दिली. विभागाने पिस्टोरियसच्या सुटकेबाबत अधिक तपशील दिलेला नाही. 

पण सकाळी ८:३० च्या सुमारास सुधार अधिकाऱ्यांनी ऑस्कर पिस्टोरियसला आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया येथील अटेरिजविले सुधारक केंद्रातून सोडून दिले. पिस्टोरियसला दोन्ही पाय नाहीत, तो कृत्रिम पायांच्या मदतीने धावतो.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंडची हत्या

ऑस्कर पिस्टोरियसने २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्प हिची हत्या केली होती. पिस्टोरियसने १४ फेब्रुवारी २०१३ च्या पहाटे स्टीनकॅम्पला टॉयलेटच्या दारातून गोळ्या घालून ठार केले. त्याला १३ वर्षांची शिक्षा झाली, आतापर्यंत त्याने ९ वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्याला नोव्हेंबरमध्ये पॅरोल मंजूर झाला होता.

दक्षिण आफ्रिकेत जे लोक गंभीर गुन्हे करतात ते किमान अर्धी शिक्षा भोगल्यानंतर पॅरोलसाठी पात्र ठरतात. 

ऑस्कर पिस्टोरियसची शिक्षा २०२९ मध्ये संपेल

पिस्टोरियसच्या सुटकेची घोषणा करताना सुधारणा विभागाने सांगितले की 'ऑस्कर पिस्टोरियस ५ जानेवारी २०२४ पासून पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. त्याला सामुदायिक सुधारणा प्रणालीमध्ये ठेवण्यात आले होते आणि आता तो घरी आहे.' पिस्टोरियस डिसेंबर २०२९ मध्ये त्याची उर्वरित शिक्षा संपेपर्यंत कठोर अटींवरून पॅरोलवर राहिल'.

 

WhatsApp channel

विभाग