पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ पदके जिंकली, तर अनेक भारतीय खेळाडूंची पदकं केवळ एका स्थानाने हुकली. अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये चौथे स्थान मिळवून पदकापर्यंत पोहोचू शकले नाहीत. भारताला केवळ ६ पदके मिळाली असली तरी यावेळी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू फुलराणी सायना नेहवाल हिने मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर खेळांमध्ये भारताची प्रगती झाल्याचे सांगितले आहे. सायना नेहवाल ही ऑलिम्पिक २०१२ ची पदक विजेती आहे.
एका पॉडकास्टवर बोलत असताना, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने २०१४ नंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रगतीबद्दल सांगितले. मोदी सरकार आल्यानंतर भारतीय खेळाडूंना अधिक सुविधा कशा मिळाल्या, त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला हे त्यांनी सांगितले.
सायना नेहवाल म्हणाली, "२०१४ नंतर गोष्टी घडल्या. योजना आल्या. खेलो इंडियासारख्या टॉप स्कीम्स आल्या. आता बघा ऑलिम्पिकमध्ये एका खेळाडूसाठी किती प्रशिक्षक गेले आहेत. आधी फक्त एकाच प्रशिक्षकाला परवानगी होती. २०१४-१५ नंतर असे झाले की आता. ३ प्रशिक्षक तुमच्यासोबत आहेत, १ मानसिक आरोग्य प्रशिक्षक तुमच्यासोबत आहे, कारण त्यांना वाटले असेल की आमचा खेळ काही करू शकतो, आपल्यासाठी आणखी पदके आणू शकतो.
सायना नेहवालने पुढे सांगितले की २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले तेव्हा फक्त एक प्रशिक्षक आणि फिजिओ होता. ती म्हणाली, "एकेकाळी एक प्रशिक्षक, एक फिजिओ असा नियम होता.... आता मला धक्का बसला आहे, जसे मी भारतीय बॅडमिंटनसाठी पाहिले, दोन फिजिओ आहेत, सिंधूसाठी एक फिजिओ आहे, तर आमच्या संघासाठी एक फिजिओ होता. मग प्रशिक्षक आणि तुमच्यासोबतचे सर्वोत्कृष्ट डॉक्टर दिनशा परडीवाला तिथे गेले आहेत, ते आपल्या देशाचे सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
"या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा, कारण यामध्ये सुधारणा झाल्या आहेत, २००८ किंवा २०१२ मध्ये हे झाले असते तर मला प्रशिक्षकही मिळाले असते.
तुम्हाला आता ज्या सुविधा मिळत आहेत, त्यामुळे तुम्हाला दुखापतीसारख्या अनेक गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. कारण तेव्हा संपूर्ण टीमसाठी एक फिजिओ होता, आता प्रत्येक खेळाडूसाठी आहे.
२००८ मध्ये फिजिओ किंवा ट्रेनर नव्हते, फक्त प्रशिक्षक होते. त्यानंतर २०१२ पर्यंत १ फिजिओ आणि १ प्रशिक्षक असा बदल झाला. त्याआधी आपल्याला माहितही नव्हते की फिजिओ आणि ट्रेनर इतके महत्त्वाचे असतात. नंतर असे आपल्याला समजले की फिजिओ, ट्रेनर आणि डॉक्टर हे तुम्हाला दुखापतीपासून वाचवू शकतात.”
सोबतच सायना पुढे म्हणाली, जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते, तेव्हा इतर देशांच्या खेळाडूंकडे सर्व सुविधा होत्या. तेव्हा मला माहित नव्हते की या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेव्हा मला फक्त एकच गोष्ट माहित होती की फक्त जिंकायचे आहे. कोच आणि आईदेखील हेच सांगायची की जिंकून ये, पण त्यामागे काय शास्त्र आहे हे मला माहीत नव्हते , तुम्हालाही अॅनालिस्टची देखील गरज हवी आहे, हे मला माहीत नव्हते.
पुढे सायनाला विचारण्यात आले की, त्यावेळी तुझे वय केवळ १८ वर्षे होते, पण सरकारला तरी माहिती होती का की, खेळाडूंना काय आणि कोणत्या गोष्टींची गरज आहे. यावर उत्तर देताना सायनला म्हणाली, "भाजप आल्यानंतरच आमच्याकडे परदेशी प्रशिक्षक आले आहेत. मात्र, ते आधीच्या सरकारपासून सुरू झाले होते. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण याआधी मी परदेशी फिजिओला नोकरी देण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे शुल्क ८-९ लाख रुपये होते.