Mary Kom : बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mary Kom : बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच

Mary Kom : बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच

Jan 27, 2025 12:47 PM IST

Mary Kom Maha Kumbh : मेरी कोमचा महाकुंभ मेळ्यात स्नान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मेरी कोम पाण्यात बॉक्सिंग पंच मारतानाही दिसत आहे.

बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच
बॉक्सर मेरी कोम पोहोचली महाकुंभला, गंगेत स्नान करताना लगावले बॉक्सिंग पंच

महान बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम हिने रविवारी (२६ जानेवारी) कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले. प्रयागराजमध्ये डुबकी मारल्यानंतर मेरी कोमने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. यावेळी मेरी कोम खूप आनंदी दिसत होती.

मेरी कोमचा महाकुंभ मेळ्यात स्नान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मेरी कोम पाण्यात बॉक्सिंग पंच मारतानाही दिसत आहे. प्रयागराज येथील संगमात स्नान करताना मेरी कोम म्हणाली, की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांमुळे महाकुंभ संस्मरणीय झाला आहे.

'पंतप्रधानांनी देशासाठी खूप काही केले'

प्रयागराजमध्ये डुबकी घेतल्यानंतर मेरी कोम म्हणाली, की तिला हिंदू धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. तिने कुंभमेळ्यातील तिच्या सहभागाचे वर्णन "सर्वोत्तम क्षण" म्हणून केले. तसेच, भारतीय बॉक्सरने सर्वसमावेशक आध्यात्मिक मेळावा म्हणून या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

मेरी कोम म्हणाली की, आपल्या पंतप्रधानांनी देशासाठी खूप काही केले आहे. मी महाकुंभसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही आभार मानू इच्छिते.

'ख्रिश्चन आणि हिंदूंनी नेहमीच एकमेकांवर प्रेम केले'

मेरी कोम म्हणाली की, मी पहिल्यांदाच महाकुंभात आले आहे, पण इथली व्यवस्था खूप चांगली आहे. मी ख्रिश्चन आहे, पण मला हिंदू धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. आपल्या पंतप्रधानांनी देशासाठी खूप काही केले आहे. या मेळ्याची एवढी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे की अनेक देशांतून लोक येथे आले आहेत.

अमेरिका आणि जपानमधूनही लोक कुंभासाठी आले आहेत. देशाची खूप प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. कुंभमेळ्यात आल्याने मला खूप आनंददायी अनुभूती येत असल्याचेही तिने सांगितले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला महाकुंभसारख्या भव्य कार्यक्रमात सहभागी होता आले.

सनातन धर्म फार जुना आहे. त्याचा नेहमीच आदर केला जाईल. ख्रिश्चन आणि हिंदूंनी नेहमीच एकमेकांवर प्रेम केले आहे, असेही मेरी कोम म्हणाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या