शंभू बॉर्डरवर सुरू असलेल्या किसान आंदोलनाला शनिवारी (३१ ऑगस्ट २०२४) २०० दिवस पूर्ण झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलक आजही तेथे जमले आहेत.
दरम्यान, आज सकाळी कुस्तीपटू विनेश फोगट हिने शंभू बॉर्डवर पोहोचली. येथे शेतकऱ्यांनी विनेश फोगट हिचा मोठा सन्मान केला. यावेळी विनेशने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच, प्रत्येकाने स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.
यावेळी विनेश फोगट सांगितले, की "देशातील शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळेच येथे आंदोलन सुरू आहे. पण आपलीच माणसं जर अशी रस्त्यावर बसली तर देशाची प्रगती कशी होईल? मला वाटते, प्रत्येकाने स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर यावे."
दरम्यान, शंभू बॉर्डवर १३ फेब्रुवारीपासून MSP च्या कायदेशीर हमीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. पोलिसांनी त्यांची दिल्ली पदयात्रा थांबवली होती. पण आता लवकरच खनौरी, शंभू आणि रतनपुरा बॉर्डवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शेतकरी नेते बलदेव सिंह बग्गा यांनी सांगितले की, सरकारशी संवाद साधण्याचा अनेक प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पीएम मोदींना अनेकदा पत्रेही लिहिली होती, पण तिथूनही उत्तर मिळाले नाही. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. ३१ ऑगस्ट रोजी शंभू आणि खनौरी येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा व्हावे, असे आवाहन किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी केले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत हिच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला कंगना राणौतच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कंगाने किसान आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली होती, तसेच, विवादास्पद टिप्पणी केली होती, त्यामुळे शेतकरी आदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.