Ojas Deotale And Jyothi Vennam gold medal : एशियन गेम्स 2023 मध्ये भारताच्या ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या मिश्र संघाने कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले आहे. ज्योती आणि ओजस देवतळे यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन जोडीचा १५९-१५८ असा पराभव केला. यासह भारताने जकार्ता येथे ७० पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारताने मिळवलेले आतापर्यंतचे हे ७१ वे पदक आहे. २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ७० पदके जिंकली.
पहिली फेरी:
दोन्ही भारतीय तिरंदाजांनी दोन्ही प्रयत्नांत प्रत्येकी १० गुण मिळवले. म्हणजेच भारताला एकूण पूर्ण ४० गुण मिळाले. त्याचवेळी दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांनी पहिल्या प्रयत्नात ९ गुण मिळवले. पहिल्या फेरीनंतर स्कोअर ४०-३९ असा भारताच्या बाजूने होता.
दुसीर फेरी:
कोरियन जोडीने प्रथम प्रयत्न केला आणि चारही बाण अचूक मारून ४० गुण मिळवले. भारतीय तिरंदाजांनीही कोणतीही चूक केली नाही आणि पूर्ण ४० गुण मिळवले. दुसऱ्या फेरीनंतरही भारतीय संघ ८०-७९ असा आघाडीवर राहिला.
तिसरी फेरी:
कोरियन तिरंदाजांनी दबावाखाली चांगली कामगिरी केली आणि पूर्ण ४० गुण मिळवले. भारतासाठी ओजसने एका प्रयत्नात ९ गुण मिळवले आणि भारताची आघाडी संपुष्टात आली. तिसरी फेरी संपल्यानंतर दोन्ही संघ ११९-११९ अशा बरोबरीत राहिले.
चौथी फेरी:
भारतीय संघाने प्रथम प्रयत्न केला आणि दोन्ही तिरंदाजांनी १० गुण मिळवले. त्याचवेळी कोरियाच्या जूला केवळ ९ गुण मिळवता आले. भारताकडे एका गुणाची आघाडी होती. चारही तिरंदाजांनी शेवटच्या प्रयत्नात १० गुण मिळवले. मात्र, जूच्या चुकीमुळे अखेरीस भारतीय संघ १५९-१५८ असा आघाडीवर राहिला आणि सुवर्णपदक जिंकले.
ज्योती वेनमने भारतासाठी चमकदार कामगिरी करत आठही प्रयत्नांत लक्ष्य गाठले. तिला पूर्ण ८० गुण मिळाले. त्याचवेळी तेजसला एका प्रयत्नात केवळ नऊ गुण मिळवता आले. त्याने आठ प्रयत्नांत ७९ गुण मिळवले.
तत्पूर्वी, आज (१० ऑक्टोबर) मंजू राणी आणि राम बाबू यांनी ३५ किमी रेस वॉक मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला दिवसातील पहिले पदक मिळवून दिले. या जोडीने कांस्यपदक जिंकले. यासह, भारताने मागील एशियन गेम्सच्या (आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम) पदकांच्या संख्येशी बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ७० पदके जिंकली. जकार्ता येथे १६ सुवर्ण, २६ रौप्य, २९ कांस्य अशी एकूण ७१ पदके जिंकली.
संबंधित बातम्या