Odisha Train Accident : कोहली ते वीरू... रेल्वे अपघातामुळे टीम इंडिया शोकसागरात, कोण काय म्हणालं? पाहा-odisha train tragedy virat kohli and indian athletes shocked left heartbroken by deadly odisha train accident ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Odisha Train Accident : कोहली ते वीरू... रेल्वे अपघातामुळे टीम इंडिया शोकसागरात, कोण काय म्हणालं? पाहा

Odisha Train Accident : कोहली ते वीरू... रेल्वे अपघातामुळे टीम इंडिया शोकसागरात, कोण काय म्हणालं? पाहा

Jun 03, 2023 06:02 PM IST

cricketers on Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे क्रीडा जगतालाही मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली, सेहवागसह अनेक खेळाडूंनी दुःख व्यक्त केले आहे. सर्वांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

Odisha Train Accident
Odisha Train Accident

Virat Kohli on Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताने सर्वांनाच (odisha train accident) धक्का बसला आहे. या अपघातामुळे क्रीडा जगतालाही मोठा धक्का बसला आहे. स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, श्रेयस अय्यर, माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांच्यासह अनेक खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

कोहलीने ट्विटमध्ये लिहिले की, ‘ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. तसेच, मी जखमी लोकं लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो’.

वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेसच्या रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या सर्व कुटुंबीयांच्या संवेदना आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. तर श्रेयस अय्यरने लिहिले की, ‘ओडिशातील अपघाताचे फोटो भयानक आहेत.’

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येथे टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर हा जेतेपदाचा सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. या सामन्यासाठी दोन्ही संघ लंडनमध्ये आहेत. तिथून भारतीय खेळाडूंनी ट्विट करून या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कसा घडला अपघात?

हा भीषण रेल्वे अपघात बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्टेशनवर झाला, हे स्टेशन ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे १७१ किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे १६६ किमी अंतरावर आहे. या स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली.

रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे बाहेरच्या बाजूला उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. यानंतर अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले.

Whats_app_banner