मराठी बातम्या  /  क्रीडा  /  विल्यमसन आणि निकोल्सनं ठोकली द्विशतकं, न्यूझीलंड-श्रीलंका कसोटीत विक्रमांचा पाऊस
Kane Williamson and Henry Nicholls
Kane Williamson and Henry Nicholls

विल्यमसन आणि निकोल्सनं ठोकली द्विशतकं, न्यूझीलंड-श्रीलंका कसोटीत विक्रमांचा पाऊस

18 March 2023, 16:20 ISTRohit Bibhishan Jetnavare

Kane Williamson and Henry Nicholls NZ vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स या किवी फलंदाजांनी द्विशतके झळकावून अनेक विक्रम केले.

Kane Williamson and Henry Nicholls double century : न्यूझीलंड आणि श्रीलंका (NZ vs SL 2nd Test) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ४ बाद ५८० धावांवर आपला डाव घोषित केला. यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद २६ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

त्यापूर्वी आज (१८ मार्च) या सामन्यात केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांनी शानदार खेळी खेळली. या दोन्ही किवी फलंदाजांनी आज द्विशतके झळकावली.

वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त ४८ षटके खेळली गेली. किवी संघाने पहिल्या दिवशी २ गडी गमावून १५५ धावा केल्या होत्या. विल्यमसन आणि निकोल्स नाबाद परतले होते. यानंतर दुस-या दिवशी दोघांनीही आपला डाव पुढे सुरू केला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३६३ धावांची भागीदारी झाली. येथे केन विल्यमसन २१५ धावा करून बाद झाला. यानंतर निकोल्सने डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडलसह किवी संघाला साडेपाचशेच्या पुढे नेले आणि स्वताचे द्विशतक पूर्ण केले. तो २०० धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. विल्यमसन आणि निकोल्सच्या या खेळीने या सामन्यात अनेक विक्रम झाले.

१) न्यूझीलंडसाठी एकाच कसोटीत दोन द्विशतके होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२) कसोटी डावात दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही १८वी वेळ होती.

३) न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी डावात दोन फलंदाजांनी द्विशतक झळकावले.

४) कसोटी क्रिकेटमध्ये ८व्यांदा ३००+ धावांची भागीदारी झाली.

५) विल्यमसन आणि निकोल्स यांच्यातील ३६३ धावांची भागीदारी ही न्यूझीलंडसाठी ५वी सर्वोच्च भागीदारी आहे.

६) या खेळीनंतर विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिला किवी फलंदाज ठरला आहे.

७) यासह केन विल्यमसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके (४१) झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने रॉस टेलरचा (४०) विक्रम मोडीत काढला.