Novak Djokovic Viral Video: टेनिस जगतातील प्रतिष्ठित स्पर्धा विम्बल्डन २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना लंडन येथे पार पडला. या सामन्यात स्पेनचा अव्वल मानांकित कार्लोस अल्कारेझने द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच यांचा रोमहर्षक पराभव केला. या सामन्यातील पहिला सेट जिंकल्यानंतरही जोकोविच याच्या पदरात निराशा पडली. या पराभवानंतर जोकोविच खूप निराशा दिसला. यावेळी मुलाला पाहून तोही भावूक झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
विम्बल्डन २०२३ पुरुषांचा अंतिम सामना पाहण्यासाठी नोवाक जोकोविचची पत्नी आणि त्यांची दोन मुले पोहोचली. सामना संपल्यानंतर जोकोविच लहान मुलगा स्टीफनबद्दल बोलताना भावूक झाला. जोकोविच म्हणाला की, माझ्या मुलाला अजूनही तिथे हसताना पाहून खूप आनंद वाटतोय. माझ तुमच्यावर प्रेम आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. यावेळी जोकोविच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये अल्कारेझचा पराभव झाला. यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले. त्याने हा सामना १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६-४ अशा सेटने जिंकला. हे त्याचे दुसरे ग्रँड स्लॅम, तर विम्बल्डनचा पहिला किताब होता.
नोवाक जोकोविचने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकले होते. यानंतर आता विम्बल्डनमध्ये सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्यावर त्याचे लक्ष होते, मात्र त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. आतापर्यंत जोकोविचने सात वेळा विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.