पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये स्वप्नील कुसळे याने नेमबाजीत कांस्यपदकाची कमाई केली. यासह तो संपूर्ण भारताचा हिरो ठरला आहे. स्वप्नील कुसळेच्या या ऐतिहासिक यशानंतर त्याची एक मोठी समस्यादेखील दूर झाली आहे.
वास्तविक, मध्य रेल्वेच्या कार्यालयात वर्षानुवर्षे अडकलेली त्याची बढतीची फाईल पुढे सकरण्यातही ऑलिम्पिक पदकाने मदत केली आहे. २०१५ पासून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या स्वप्नीलला एकदाही पदोन्नती मिळाली नाही. शूटर स्वप्नील कुसळे याने यासाठी वारंवार विनंती केली होती.
पण स्वप्नीलचे प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी यांनी एका वृत्तपत्राला सांगितल्यानुसार, तो त्याच्या कार्यालयातील वरिष्ठांच्या वृत्तीमुळे खूप निराश झाला होता.
गेल्या ९ वर्षांपासून ते रेल्वेमध्ये काम करत आहे, परंतु त्याला कधीही प्रमोशनसाठी पात्र मानले गेले नाही.
पण आता ऑलिम्पिक मेडलनंतर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, पॅरिस कांस्यपदक विजेत्या स्वप्नील कुसळे याला शुक्रवारपर्यंत म्हणजे आज (२ ऑगस्ट) दुहेरी बढती मिळेल.
ते म्हणाले की, “ही चुकीची माहिती आहे. त्याची बढती थांबली नाही. ते पुढे म्हणाले, आम्ही महाव्यवस्थापकांशी बोललो आहोत आणि आशा आहे की त्यांना दोन दिवसांत दुप्पट पदोन्नती मिळेल. दरम्यान, कार्यालयातील वरिष्ठांच्या वागणुकीमुळे स्वप्नील दुखावल्याचे त्याच्या रेल्वेतील सहकाऱ्यांनी सांगितले”.
यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर स्वप्नील कुसळेच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, जेव्हा जेव्हा स्वप्नीलने त्याच्या प्रमोशनबद्दल विचारले तेव्हा त्याला कठोर उत्तरे मिळाली आणि यामुळे तो आणखी दुखावला गेला.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यानंतर स्वप्नील कुसळे म्हणाला होता, की 'मी नेमबाजीत कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. पण इतर खेळांमध्ये धोनी माझा फेव्हरेट आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तोदेखील एके काळी टीसी होता आणि मी सुद्धा.'
स्वप्नील कुसळे २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. त्याचे वडील आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे.
त्याच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, 'आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनू भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. ती जिंकू शकते तर आपणही जिंकू शकतो.
संबंधित बातम्या