Paralympics : भारताच्या नितेश कुमारनं रचला इतिहास, पॅरा बॅडमिंटनमध्ये जिंकलं सुवर्णपदक-nitesh kumar clinches paralympic badminton gold indias second at paris games 2024 india medals tally paralympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paralympics : भारताच्या नितेश कुमारनं रचला इतिहास, पॅरा बॅडमिंटनमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Paralympics : भारताच्या नितेश कुमारनं रचला इतिहास, पॅरा बॅडमिंटनमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Sep 02, 2024 05:42 PM IST

India Medals Tally Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एकंदरीत, २०२४ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे नववे पदक आहे.

India's para-shuttler Nitesh Kumar in action
India's para-shuttler Nitesh Kumar in action (The Khel India - X)

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नितेश कुमार याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एकंदरीत, २०२४ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे नववे पदक आहे.

नितेश पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकावर नाव कोरून इतिहास रचला. 

पॅरालिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

भारताच्या झोळीत नववे पदक

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ९ पदके जिंकली आहेत. सध्याच्या गेम्समध्ये नितीश कुमार हा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नेमबाजीत आतापर्यंत भारताने ४ पदके जिंकली आहेत. अवनी लेखराने सुवर्ण, मनीष नरवालने रौप्य, मोना अग्रवाल आणि रुबिना फ्रान्सिसने कांस्यपदक जिंकले.

ॲथलेटिक्समध्येही देशाला ४ पदके मिळाली आहेत. निषाद कुमारने उंच उडीत रौप्य, योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्यपदक, तर प्रीती पालने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.

बॅडमिंटनमध्ये आणखी २ पदकांची अपेक्षा 

नितेश कुमार याच्यानंतर भारताला बॅडमिंटनमध्ये आणखी २ पदके मिळू शकतात. सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL4 प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे, म्हणजेच त्याचे रौप्य पदक निश्चित आहे. 

या प्रकारात सुकांत कदम कांस्यपदकाच्या लढतीत सहभागी होणार आहे. गेल्या वेळी भारताला बॅडमिंटनमध्ये केवळ एकच पदक जिंकता आले होते, पण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील पदकांची संख्या ५ च्या वर जाऊ शकते.