मराठी बातम्या  /  क्रीडा  /  World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार कोण? हेड कोचनं सांगितली ही दोन नावं

World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार कोण? हेड कोचनं सांगितली ही दोन नावं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 04, 2023 06:55 PM IST

new zeland captain for odi world cup 2023 : वनडे वर्ल्डकप या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. या विश्वचषकात टीम साऊथी किंवा टॉम लॅथम यापैकी एकजण न्यूझीलंड संघाची धुरा सांभाळू शकत.

new zeland captain for odi world cup 2023
new zeland captain for odi world cup 2023

न्यूझीलंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार केन विल्यम्स आयपीएल 2023 दरम्यान गंभीर जखमी झाला होता. यानंतर विल्यमसन एकदिवसीय विश्वचषक (ODI WORLD CUP 2023) खेळणे जवळजवळ अशक्य आहे. अशा स्थितीत ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात किवी संघाचा कर्णधार कोण असेल?, याबाबत न्यूझीलंड क्रिकेटमध्ये मंथन सुरू झाले आहे. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांना याबाबत विचारले असता त्यांनी दोन नावांचा उल्लेख केला आहे.

स्टीड म्हणाले की, 'ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे. टीम साऊदी आमच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे आणि टॉम लॅथमने यापूर्वी बरेच व्हाईट बॉल क्रिकेट खेळले आहे. पाकिस्तानातही त्याने उत्तम कर्णधारपद भूषवले आहे. स्टीडच्या वक्तव्यानंतर या दोघांपैकी एकजण विश्वचषकात किवी संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कदाचित टॉम लॅथमला येथे प्राधान्य मिळू शकते.

टॉम लॅथमचा दावा अधिक मजबूत

केन विल्यमसन अनुपस्थित असताना टॉम लॅथमने किवी संघाचे नेतृत्व केले आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान दौऱ्यावर न्यूझीलंडने टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. मात्र, वनडे मालिकेत त्यांचा १-४ असा पराभव झाला. किवी संघाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे न्यूझीलंडचे बहुतेक मोठे खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत.

टीम साऊथी सर्वात अनुभवी खेळाडू

तसे पाहता, टीम साऊथी सध्या न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला भारतातही खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. विश्वचषक फक्त भारतातच खेळवला जाणार आहे, अशा परिस्थितीत न्यूझीलंड क्रिकेटही आपल्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी साऊदीला देऊ शकते. गेल्या वर्षी विल्यमसनला कसोटीच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर साऊथीची रेड बॉल क्रिकेटचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या