मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kane Williamson : न्यूझीलंडला जबर धक्का, विल्यमसन वर्ल्डकपला मुकणार, या दिवशी होणार सर्जरी

Kane Williamson : न्यूझीलंडला जबर धक्का, विल्यमसन वर्ल्डकपला मुकणार, या दिवशी होणार सर्जरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 06, 2023 02:00 PM IST

Kane Williamson injury : IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात गुजरातचा स्टार खेळाडू केन विल्यमसन जखमी झाला होता. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनला आता लिगामेंटची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. अशा स्थितीत तो आगामी वनडे विश्वचषकातून बाहेर पडू शकतो.

Kane Williamson ODI World Cup 2023
Kane Williamson ODI World Cup 2023

Kane Williamson ODI World Cup 2023 : न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसन या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर होऊ शकतो. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या चालू हंगामात गुजरात टायटन्स (GT) कडून खेळताना विल्यमसनला दुखापत झाली होती.

दुखापतीनंतर विल्यमसन न्यूझीलंडला परतला आहे आणि आता त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे स्कॅनद्वारे स्पष्ट झाले आहे. अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनला दुखापत झाली होती.

पुढील तीन आठवड्यांच्या आत ऑपरेशन होणार

न्यूझीलंड क्रिकेटने सांगितल्यानुसार, केन विल्यमसनवर पुढील तीन आठवड्यांच्या आत शस्त्रक्रिया केली जाईल. ही बातमी मिळाल्यानंतर विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेट आणि आयपीएल फ्रँचायझीचे आभार मानले आहेत.

विल्यमसन काय म्हणाला?

विल्यमसन म्हणाला की, 'मला याआधीही खूप पाठिंबा मिळाला आणि त्यासाठी मी गुजरात टायटन्सचे आभार मानतो. अशी दुखापत झाल्यानंतर मी निराश होणे स्वाभाविक आहे, पण माझे लक्ष आता शस्त्रक्रिया करून पुन्हा फिटनेस मिळवण्यावर आहे. विल्यमसन म्हणाला, 'काही वेळ लागेल, पण लवकरात लवकर मैदानात उतरण्यासाठी मी माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न करेन.'

विश्वचषकापर्यंत पूर्णपणे फिट होणे अशक्य

या प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी बराच वेळ लागतो आणि हे पाहता विल्यमसन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होणे अशक्य दिसते. विल्यमसन म्हणाला, 'मी पुढील काही महिन्यांत मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड आणि संघाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करत आहे.'

विश्वचषकापूर्वी विल्यमसनला तंदुरुस्त होणे कठीण असल्याचे न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टीड यांनाही वाटते. ते म्हणाले, 'आम्ही आशा सोडलेली नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता ते अशक्य वाटते. आमच्या भावना सध्या केनसोबत आहेत. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. तुम्हाला ज्या प्रकारची दुखापत अपेक्षित होती ती अशी नाही. हा खरोखरच धक्का आहे".

WhatsApp channel