gt vs csk qualifier 1 match : चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मंगळवारी (२३ मे) चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या विजयानंतर सीएसकेने विक्रमी १०व्यांदा आयपीएलची फायनल गाठली.
चेपॉकवर खेळल्या गेलेल्या चेन्नई आणि गुजरात सामन्याने व्ह्युवरशीपचे सर्व विक्रम मोडले आहेत आणि नवा इतिहास रचला आहे.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्याने जिओ सिनेमावरील दर्शकसंख्येचा नवा विश्वविक्रम रचला गेला. गुजरातच्या डावाच्या शेवटच्या षटकात २.५ कोटी लोकांनी Jio Cinema वर एकाच वेळी सामना पाहिल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने CSK आणि RCB सामन्याचा जुना दर्शक रेकॉर्ड मोडला आहे. १७ एप्रिल रोजी RCB-चेन्नई यांच्यातील सामना Jio सिनेमावर २.४ कोटी लोकांनी एकाच वेळी पाहिला होता. दरम्यान, IPL 2023 चे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर दाखवले जात आहे.
पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १५७ धावांवर आटोपला. संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर सीएसकेकडून गोलंदाजीत रवींद्र जडेजा आणि महेश थीक्षनाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर मथिशा पाथिरानानेही शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली.