पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक जिंकले. यानंतर तो प्रचंड चर्चेत आहे. नीरज हा भारतीय क्रिकेटपटूंइतकाच लोकप्रिय आहे. त्याची जीवनशैली आलीशान आहे. त्याच्याकडे आलिशान घर, आलिशान कार आणि त्याचे बाईक कलेक्शनही अप्रतिम आहे.
अशातच आता नीरज चोप्राचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याने मनगटावर ५२ लाख रुपयांचे घड्याळ घातले असल्याचा दावा केला जात आहे. ऑलिम्पिकमधील भालाफेकच्या अंतिम सामन्यादरम्यानही त्याने हे घड्याळ घातले होते.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राने ५२ लाख रुपयांचे घड्याळ घातले होते, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. वास्तविक, नीरज चोप्रा याने ओमेगा (OMEGA) कंपनीचे घड्याळ घातले आहे, जी १८४८ सालापासून लग्झरी घड्याळे बनवत आहे.
विशेष म्हणजे, यावर्षीच ओमेगा कंपनीने या भारतीय ऑलिम्पिक स्टार नीरज चोप्रा याला आपला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले होते. ओमेगा ही छोटी कंपनी नाही कारण ती १९३२ पासून ऑलिम्पिक खेळांची अधिकृत टाइमकीपर आहे.
नीरज चोप्राने आपल्या मनगटावर परिधान केलेल्या घड्याळाचे मॉडेल Seamaster Aquaterra 150M आहे, ज्याची भारतात किंमत ५२ लाख १३ हजार २०० रुपये आहे. ओमेगा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रत्येक घड्याळाची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे आणि ती खरोखरच एक लक्झरी घड्याळ ब्रँड आहे, परंतु नीरज चोप्राच्या घड्याळाची वास्तविक किंमत सुमारे ५.५ लाख रुपये आहे.
नीरज चोप्राचे हे घड्याळ टायटॅनियम धातूचे आहे. त्यावर क्रिस्टल्स आहेत, जे स्क्रॅचपासून संरक्षण करतात. घड्याळाचा आतील भाग राखाडी रंगाचा आहे, त्यात सुंदर पट्टे (रेषा) आणि सीमास्टर लोगो आहे. घड्याळाचा पट्टा काळा रंगाचा आहे आणि घड्याळाव्यतिरिक्त, पट्टा देखील वॉटरप्रूफ आहे. OMEGA चा ब्रँड ॲम्बेसेडर बनलेला नीरज हा पहिला भारतीय ॲथलीट आहे.
घड्याळांव्यतिरिक्त, भारताच्या भालाफेक स्टारकडे आलीशान कार कलेक्शन देखील आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याच्याकडे फोर्ड मस्टँग जीटी, महिंद्रा थार आणि रेंज रोव्हर स्पोर्ट सारख्या आलीशान गाड्या असल्याचे दिसून आले आहे. बाईकबद्दल बोलायचे झाले तर बजाज पल्सर व्यतिरिक्त त्याच्याकडे हार्ले डेविडसन देखील आहे.