मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra : रोमहर्षक! पहिल्या फाउलनंतरही नीरजने कसे जिंकले सुवर्ण पदक? पाहा, ८८.१७ मीटरचा गोल्डन थ्रो

Neeraj Chopra : रोमहर्षक! पहिल्या फाउलनंतरही नीरजने कसे जिंकले सुवर्ण पदक? पाहा, ८८.१७ मीटरचा गोल्डन थ्रो

Aug 28, 2023 11:24 AM IST

Neeraj Chopra Gold Medal, World Athletics Championships : भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी एकूण १२ खेळाडू पात्र ठरले होते. यामध्ये नीरजसह तीन भारतीय खेळाडूंचा सहभाग होता.

Neeraj Chopra Gold Medal
Neeraj Chopra Gold Medal

Neeraj Chopra Gold Medal Javelin Throw : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. करोडो चाहत्यांनी नीरजचा हा परफॉर्मन्स टीव्हीवर लाईव्ह पाहिला. भारतीय वेळेनुसार रात्री ११.४५ च्या सुमारास हा सामना सुरु झाला. यामुळे अनेक चाहत्यांना हा सुवर्ण क्षण लाईव्ह पाहता आला नाही. जर तुम्हालाही नीरज चोप्राचा गोल्डन थ्रो पाहता आला नाही तर या ठिकाणी तुम्ही तो सोनेरी क्षण पाहू शकता.

भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी एकूण १२ खेळाडू पात्र ठरले होते. यामध्ये नीरजसह तीन भारतीय खेळाडूंचा सहभाग होता. नीरजने ८८.१७ मीटर अंतराच्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. तर इतर भारतीय खेळाडूंना पदक जिंकता आले नाही. किशोर जेना पाचव्या स्थानी राहिला. त्याने ८४.७७ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. डीपी मनू सहाव्या क्रमांकावर राहिला. त्याने ८४.१४ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.

तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्यपदक जिंकले. दुसरीकडे, झेक प्रजासत्ताकच्या याकूब वडलेचने कांस्यपदक जिंकले.

ट्रेंडिंग न्यूज

अंतिम फेरीत नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला. पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याला यश आले. त्याने लांबवर भाला फेकल्यानंतर उपस्थितांना अभिवादन केले आणि मैदानावर डोकं टेकवून सर्वांना नमस्कार केला.

पारुन चौधरी आणि रिले टीमची दमदार कामगिरी

नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकले पण भारताच्या इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. या खेळाडूंना पदक जिंकला आले नाही. यामध्ये पारुल चौधरीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ११ वे स्थान मिळविले. पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला. या रेकॉर्डसह ती २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने ही शर्यत ९ मिनिटे १५.३१ सेकंदात पूर्ण केली.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत भारताला पदक मिळवता आले नाही. टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर राहिली. भारतासाठी या शर्यतीत अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनास याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी भाग घेतला. टीम इंडियाने ही शर्यत २ मिनिटे ५९.९२ सेकंदात पूर्ण केली.

WhatsApp channel