भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक-neeraj chopra won silver medal in javelin pakistan arshad nadeem won gold in paris olympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक

भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक

Aug 09, 2024 01:31 AM IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकले

भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक
भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक

नीरज चोप्राने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिकमधील भारताचे हे पाचवे पदक आहे. याआधी भारताने ४ पदके जिंकली होती. यापैकी तीन ब्राँझ नेमबाजीत आणि एक हॉकीमध्ये आले.

नीरजला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचा बचाव करता आला नाही, कारण यावेळी सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे गेले आहे. नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम मोडून संपूर्ण जगाला चकित केले आहे. 

पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर भालाफेक केली. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७  मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम रचत सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला. यापूर्वी, २०२४ हंगामात, त्याचा सर्वोत्तम थ्रो ८९.३४ मीटर होता, जो त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पात्रता फेरीत केला होता. नीरजला ६ प्रयत्न मिळाले, त्यापैकी ५ फाउल ठरले. सुवर्णपदक न जिंकल्याची निराशा नीरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

नीरजने नवा विक्रम केला

स्वतंत्र भारताचे प्रतिनिधित्व करत २ ऑलिम्पिक पदके जिंकणारा नीरज आता केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर यांनी प्रत्येकी २ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यापूर्वी नीरजने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

पाकिस्ताच्या अर्शद नदीमने इतिहास रचला

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सर्वांना चकित केले. नीरज चोप्राप्रमाणेच त्याचा पहिला प्रयत्नही फाऊला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. त्याच्या आधी, भालाफेकचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्डकिलसेनच्या नावावर होता, ज्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटर भालाफेक केली होती.