Neeraj Chopra Net Worth : पानिपतमध्ये आलिशान घर, महिन्याला लाखोंची कमाई! पदकवीर नीरज चोप्रा किती कोटींचा मालक?-neeraj chopra total net worth in 2024 and house in haryanas panipat neeraj chopra silver medal in paris olympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra Net Worth : पानिपतमध्ये आलिशान घर, महिन्याला लाखोंची कमाई! पदकवीर नीरज चोप्रा किती कोटींचा मालक?

Neeraj Chopra Net Worth : पानिपतमध्ये आलिशान घर, महिन्याला लाखोंची कमाई! पदकवीर नीरज चोप्रा किती कोटींचा मालक?

Aug 10, 2024 01:44 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची नेटवर्थ किती आहे, माहिती का?. चला तर मग जाणून घेऊया नीरज चोप्राची एकूण कमाईबद्दल.

Neeraj Chopra Net Worth : नीरज चोप्रा किती श्रीमंत? पानीपतमध्ये आलिशान घर आणि कोट्यवधींची मालमत्ता! जाणून घ्या
Neeraj Chopra Net Worth : नीरज चोप्रा किती श्रीमंत? पानीपतमध्ये आलिशान घर आणि कोट्यवधींची मालमत्ता! जाणून घ्या (PTI)

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला. नीरजने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राने २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर तो गोल्डन बॉय या नावाने प्रसिद्ध झाला.

नीरज चोप्रा भारतात आणि जगभरात खूप प्रसिद्ध आहे. एखाद्या क्रिकेटपटू व्यतिरिक्त भारतात सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून नीरज चोप्राकडे पाहिले जाते.

नीरज चोप्रा हा हरियाणाच्या पानिपत शहरातील खांद्रा गावचा रहिवासी आहे. नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी झाला. नीरज लहानपणी लठ्ठपणामुळे त्रस्त होता, त्यामुळे तो काकांसोबत स्टेडियममध्ये धावायला जायचा. यावेळी नीरज चोप्राने भालाफेकचा खेळ पाहिला आणि तो त्याच्या प्रेमात पडला.

आता तो भारताचा स्टार भाला फेकपटू बनला आहे आणि जगभरातील लोक त्याचे चाहते बनले आहेत.

नीरज चोप्रा आलिशान घरात राहतो

नीरज चोप्राचे हरियाणातील पानिपतमध्ये तीन मजली आलिशान घर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची एकूण संपत्ती किंमत कोटींच्या घरात आहे.

नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती?

मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये नीरजची एकूण संपत्ती ३८ कोटी रुपये आहे. नीरज त्याच्या कमाईचा बहुतांश भाग जाहिरातींमधून कमावतो. नीरज अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती करतो. जाहिरातींमधून कमाई करण्याच्या बाबतीत नीरज हा भारतातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे.

सोबतच नीरजला वर्षाला सुमारे ४ कोटी रुपये म्हणजे महिन्याला सुमारे ३० लाख रुपये पगार मिळतो.

२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला विविध रोख पुरस्कार मिळाले. हरियाणा सरकारने नीरजला दिलेली सर्वाधिक रक्कम ६ कोटी रुपये होती. याशिवाय भारतीय रेल्वेने नीरजला ३ कोटी रुपये, पंजाब सरकारने २ कोटी रुपये, बायजूने २ कोटी रुपये, बीसीसीआयने १ कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्सने १ कोटी रुपये दिले होते.