पॅरिस ऑलिम्पक २०२४ नीरज चोप्रा आणि मनू भाकर भारतात परतल्यानंतर चर्चेचा विषय बनले आहेत. वास्तविक, त्यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत, ज्यामुळे नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांची लव्हस्टोरी सुरू झाल्याचा दावा केला जात आहे.
एका क्लिपमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आहे आणि काहीतरी बोलताना दिसत आहेत. यानंतर सर्वांना जाणून घ्यायचे आहे की दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झाले आणि मनू भाकरच्या आईने त्याला कसली शपथ घ्यायला लावली?
खरं तर, एकीकडे सोशल मीडियावर चाहत्यांनी नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांच्या लग्नाची अटकळ बांधायला सुरुवात केली आहे. दरम्यान, एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, मनू भाकरच्या आईने नीरज चोप्राला शपथ दिली आहे की तो कधीही टेन्शन घेणार नाही, विश्रांती घेऊन पुन्हा मेहनतीने मैदानात उतरेल'.
यानतंतर सुमेधा यांनी नीरजला विचारले की त्याला त्यांची मुलगी कशी वाटते? नीरज चोप्राने लाजून उत्तर दिले आणि सांगितले की, मी मनूकडे कधीही प्रेमाच्या नजरेने पाहिले नाही. दरम्यान हिंदूस्तान टाईम्स मराठी कधीही या चर्चेला दुजोरा देत नाही, ही माहिती केवळ सोशल मीडियावरून घेतलेल्या दाव्यांवर आधारित आहे.
नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. यासह, एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारतातील पहिली खेळाडू ठरली.
दुसरीकडे, नीरज चोप्रा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा बचाव करू शकला नाही, परंतु त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्य पदक निश्चितपणे जिंकले.