पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार २६ जुलैपासून सुरू होणार आहे. पॅरिसमध्ये १०० वर्षांनंतर ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येत आहे. परिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २०६ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे (NOCs) १०,५०० खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी भारतातील २८ खेळाडूंचा गट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचा झेंडा फडकवणार आहे. भारतीय चमुचे नेतृत्व विश्वविजेता नीरज चोप्रा करणार आहे.
नुकतेच नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पॅरिसमध्ये होणारी डायमंड लीगही सोडली होती. नीरज चोपरी याच्या नेतृत्वाखालील पॅरिस ऑलिम्पिक संघात १७ पुरुष आणि ११ महिला खेळाडूंचा समावेश आहे. रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग या वर्षी ॲथलेटिक्समध्ये पात्र ठरणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले.
याशिवाय हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अविनाश साबळे आणि तजिंदरपाल सिंग तूर हे खेळाडूही या संघात आहेत.
यावेळी सर्वांचे लक्ष ४x४०० मीटर रिले संघावर असेल. या संघाने बहामास येथे होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स रिले २०२४ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे.
अविनाश साबळे (३,००० मीटर स्टीपलचेस)
नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक)
तजिंदरपाल सिंग तूर (शॉटपुट)
प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी)
अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (२० किमी शर्यत वॉक)
मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (४x४०० मीटर रिले)
मिन्जो चाको कुरियन (४x४०० मीटर रिले)
सूरज पनवार (रेस वॉक मिश्र मॅरेथॉन)
सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी).
किरण पहल (४०० मीटर)
पारुल चौधरी (३,००० मीटर स्टीपलचेस आणि ५,००० मीटर)
ज्योती याराजी (१०० मीटर हर्डल्स)
अनु राणी (भालाफेक)
आभा खटुआ (शॉटपुट)
ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेश, विथ्या रामराज, पूवम्मा एम.आर. (४x४०० मीटर रिले)
प्राची (४x४०० मीटर रिले)
प्रियांका गोस्वामी (20 किमी रेस वॉक/रेस वॉक मिश्र मॅरेथॉन).