neeraj chopra asian games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकले आहे. तर भारताच्याच किशोर जेना याने रौप्य पदक कमावले आहे.
नीरज आणि किशोर दोघेही त्यांच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या प्रयत्नात फाऊल झाले. मात्र नीरजने सुवर्णपदक तर किशोरने रौप्यपदकावर कब्जा केला. नीरजचा सर्वोत्तम थ्रो 88.88 मीटर होता, तर किशोर जेनाचा ८७.५४ मीटर होता. याच जोरावर दोघांनी पदके जिंकली. भालाफेकीत भारताने एकाच वेळी ही दोन्ही पदके जिंकण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
पहिला थ्रो : ८२.३८ मीटर
दुसरी थ्रो : ८४.४९ मीटर
तिसरा थ्रो : फाऊल
चौथा थ्रो : ८८.८८ मीटर
पाचवा थ्रो : ८०.८० मीटर
सहावा थ्रो : फाऊल
पहिला थ्रो : ८१.२६ मीटर
दुसरी थ्रो : ७९.७६ मीटर
तिसरा थ्रो : ८६.७७ मीटर
चौथा थ्रो : ८७.५४ मीटर
पाचवा फेक: फाऊल
सहावा थ्रो : फाऊल
सुवर्ण : १७
रौप्य : ३१
कांस्य: ३२
एकूण: ८०
तत्पूर्वी, पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत भारताने मोठी कामगिरी केली. अविनाश साबळेने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. या शर्यतीत गुलवीर सिंग चौथ्या स्थानावर राहिला, त्याचे कांस्यपदक हुकले. यापूर्वी याच एशियन गेम्समध्ये अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
भारतीय महिला संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या सहा वेळपासून भारत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत होता. मात्र, यावेळी भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. विथ्या रामराज, ऐश्वर्या मिश्रा, प्राची, सुभा व्यंकटेशन या संघाने रौप्यपदक पटकावले आहे.
संबंधित बातम्या