मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra : नीरज चोप्रा नवा रेकॉर्ड बनवण्यास सज्ज, कुठे, कधी आणि कसे पाहणार लाईव्ह? जाणून घ्या

Neeraj Chopra : नीरज चोप्रा नवा रेकॉर्ड बनवण्यास सज्ज, कुठे, कधी आणि कसे पाहणार लाईव्ह? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 16, 2023 10:00 PM IST

Diamond League Neeraj Chopra : भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी या स्पर्धेत उतरणार आहे. अमेरिकेचे यूजीन शहर या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करत आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra (REUTERS)

Eugene Diamond League Timing & Live Broadcast : डायमंड लीग 2023 चा अंतिम सामना आज (१६ सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेता भारतीय चाहत्यांच्या नजरा नीरज चोप्रावर असतील. 

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी या स्पर्धेत उतरणार आहे. अमेरिकेचे यूजीन शहर या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करत आहे. नीरज चोप्राचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.५० वाजता सुरू होईल. नीरज चोप्रा सध्या त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममधून जात आहे.

साऱ्यांच्या नजरा नीरज चोप्रावर

तत्पूर्वी, स्वित्झर्लंडमधील झुरिच शहरात लीगच्या ११ व्या मीटचे आयोजन करण्यात आले होते. या लीगमध्ये नीरज चोप्राने ८५.७१ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर भारतीय दिग्गज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

वास्तविक, नीरज चोप्रा हा गेल्यावर्षीच्या डायमंड लीग पुरुष भालाफेकीचा विजेता आहे. या खेळाडूने २०२२ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

मुरली श्रीशंकर, अविनाश साबळे फायनल खेळणार नाहीत 

या लीगमधील पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर आणि ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे यांनीही आपापल्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण दोघेही या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही खेळाडूंनी आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुरली श्रीशंकर आणि अविनाश साबळे यांना आशियाई खेळांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे बोलले जात आहे. या कारणास्तव दोघांनीही नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरज चोप्राला लाईव्ह कधी, कुठे आणि कसे पाहणार?

भारतीय चाहत्यांना जिओ सिनेमावर यूजीन डायमंड लीग 2023 फायनलचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. याशिवाय पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण भारतात Sports18 टीव्ही चॅनलवर होणार आहे. हे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार १२:५० वाजता सुरू होईल.

WhatsApp channel