LSG vs MI : नवीन उल हकने एकाच षटकात मोडलं मुंबई इंडियन्सचं कंबरडं, रोहित शर्मासह केली चौघांची शिकार
navee ul haq LSG vs MI IPL 2023 : आयपीएल 2023 चा एलिमिनेटर सामना लखनौ आणि मुंबई यांच्यात चेपॉकवर सुरू आहे. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८२ धावा केल्या आहेत. मुंबईकडून कॅमरोन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या.
LSG vs MI IPL 2023 : IPL 2023 मध्ये वादांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या नवीन-उल-हकने एलिमिनेटर सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. अफगाणिस्तानच्या या गोलंदाजाने आपल्या किलर बॉलिंगने मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग ऑर्डरचे कंबरडे मोडले आहे. नवीनने एकाच षटकात सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनला बाद करून मुंबईला बॅकफुटवर ढकलले.
ट्रेंडिंग न्यूज
आयपीएल 2023 चा एलिमिनेटर सामना लखनौ आणि मुंबई यांच्यात चेपॉकवर सुरू आहे. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८२ धावा केल्या आहेत. मुंबईकडून कॅमरोन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या.
तत्पूर्वी, एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या वेगवान गोलंदाजांनी कहर केला. तिसऱ्याच षटकात नवीन उल हकने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने ११ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी तुफानी फलंदाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ग्रीन आणि सूर्याने बॅटने कहर केला, पण कर्णधार क्रुणाल पांड्याने ११व्या षटकात चेंडू पुन्हा नवीनकडे सोपवला. यानंतर नवीनने सुर्या आणि ग्रीनला एकाच षटकात बाद करून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
एका षटकात दोन मोठे बळी
नवीन-उल-हकने ११व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा (२० चेंडूत ३३ धावा) डाव संपुष्टात आणला. सूर्या बाद झाल्यानंतर त्याच षटकात नवीनने ग्रीनचा ऑफ स्टंप उखडून टाकला. नवीन उल हकने सामन्यात ३८ धावांत ४ बळी घेतले. तर दुसरा वेगवान गोलंदाज यश ठाकुरने ३४ धावांत ३ बळी घेतले.
ग्रीनने वेगवान खेळी खेळली
कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी बॅटने कहर केला. मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ग्रीन सुरुवातीपासूनच फॉर्मात दिसत होता आणि त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ग्रीनने १७८ च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला.