मराठी बातम्या  /  क्रीडा  /  National Sports Day : २९ ऑगस्टलाच का साजरा केला जातो क्रीडा दिन? या क्रीडापटूंचे कोट्स देतील तुम्हाला नवी प्रेरणा

National Sports Day : २९ ऑगस्टलाच का साजरा केला जातो क्रीडा दिन? या क्रीडापटूंचे कोट्स देतील तुम्हाला नवी प्रेरणा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 28, 2023 05:11 PM IST

national sports day 2023 quotes : देशात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) साजरा केला जातो. याच दिवशी १९०५ साली भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.

national sports day 2023
national sports day 2023

भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी १९०५ साली महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा प्रयागराज येथे जन्म झाला होता. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. क्रीडा दिनानिमित्त देशवासीयांना खेळाबाबत जागरूक करण्यासोबतच त्यांना तंदुरुस्त राहण्याच्या सूचनाही दिल्या जातात. भारतामध्ये २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिन साजरा केला जातो, तर इतर देशांमध्ये क्रीडा दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशात अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये कबड्डी, मॅरेथॉन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी आणि इतर अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या हॉकी कारकिर्दीत ५०० हून अधिक गोल केले.

स्पोर्ट्स डे साजरा करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे युवा खेळाडूंना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे. यामुळे तो तंदुरुस्त राहू शकतो आणि आपल्या खेळाबाबत गंभीर राहू शकतो. क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त काही महत्त्वाचे कोट्स

"जर मी, दोन मुलांची आई, पदक जिंकू शकले, तर तुम्हीदेखील हे करू शकता. माझे उदाहरण घ्या आणि हार मानू नका." - मेरी कोम

"जेव्हा लोक तुमच्यावर दगड फेकतील. तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मैलाचे दगड बनवा - सचिन तेंडुलकर

"तुमची स्वप्ने. तुमची योजनांमध्ये अनेक अडथळे येतील. शंका उपस्थित होतील. चुका होतील. पण कठोर परिश्रमाने आणि विश्वासाने तुम्ही सर्वकाही हासील करू शकता." - मायकेल फेल्प्स

"तुमची स्वप्नेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करतात. त्यांच्यात तुम्हाला पंख देण्याची आणि उंच उडण्याची ताकद आहे" - पीव्ही सिंधू

"मला नेहमीच वाटायचे की माझी सर्वात मोठी संपत्ती ही माझी शारीरिक क्षमता नाही, तर ती माझी मानसिक क्षमता आहे." - ब्रूस जेनर

"जर माझ्याकडे काहीतरी करण्याचे कारण असेल आणि इच्छाशक्ती असेल तर मी नेहमची यशस्वी होतो" - लिएंडर पेस

WhatsApp channel

विभाग