Devabhau Kesari 2025 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे यंदाही कुस्तीचा थरार रंगणार आहे. जामनेर येथे १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ’सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कुस्ती स्पर्धेत भारतासह, फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
जामनेरची कुस्ती स्पर्धा १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि रात्री ८ वाजेपर्यंत चालेल.
याच स्पर्धेत यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हेदेखील सहभागी होणार आहेत. तसेच, यंदाच्या महाराष्ट्र केसरी पंचांना मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेला शिवराज राक्षेदेखील या स्पर्धेत खेळणार आहे.
नमो कुस्ती महाकुंभ’सोबत ‘देवाभाऊ केसरी' या दंगलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दहिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. इराणचा जलाल म्हजोयूब
महेंद्र गायकवाड (उपमहाराष्ट्र केसरी) वि. रोमानियाचा युरोपियन विजेता फ्लोरिन ट्रिपोन
शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन)
सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन - मोल्दोवा)
विजय चौधरी (ट्रिलप महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन, एशियन चॅम्पियन
भाग्यश्री कोळी (ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी) वि. युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूला (एस्टोनिया)
प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स)
अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टन ऑलीम्पियन रोमानिया)
संबंधित बातम्या