मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Viral Video: मुरली विजयची सटकली! डीकेच्या नावानं चिडवणाऱ्यांची केली धुलाई

Viral Video: मुरली विजयची सटकली! डीकेच्या नावानं चिडवणाऱ्यांची केली धुलाई

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 28, 2022 02:08 PM IST

Murali vijay: यापूर्वी देखील अनेका क्रिकेट चाहत्यांनी मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) नावाचा जयघोष केला आहे. या स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात कार्तिकच्या नावाने चिडवणाऱ्या फॅन्ससमोर मुरली विजय हात जोडताना दिसला होता. मात्र, यावेळी त्याचा संयम सुटला.

murali vijay
murali vijay

Murali vijay: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२२ ही स्पर्धा एका वादामुळे चर्चेत आली आहे. सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर मुरली विजय याने प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. २४ जुलै रोजी मदुराई पँथर्स विरुद्ध रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली.

दरम्यान, या सामन्यात मुरली विजय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, पण काही काळासाठी क्षेत्रक्षण करण्यासाठी तो मैदानावर उतरला होता. त्यावेळी काही प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या नावाचा जयघोष सुरू केला. त्यानंतर चिडलेल्या मुरली विजयने थेट प्रेक्षकांमध्ये घुसून चिडवणाऱ्याची धुलाई केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

विजयची पत्नी निकिता वंजारा ही दिनेश कार्तिकची पहिली पत्नी आहे. विजयसोबतच्या अफेअरनंतर कार्तिक आणि निकिताचा घटस्फोट झाला. पुढे निकिताने विजयसोबत लग्न केले. या घटनेमुळे प्रेक्षक सामन्यादरम्यान विजयला सतत ट्रोल करत आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वी देखील अनेका क्रिकेट चाहत्यांनी मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकच्या नावाचा जयघोष केला आहे. या स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात कार्तिकच्या नावाने चिडवणाऱ्या फॅन्ससमोर मुरली विजय हात जोडताना दिसला होता. मात्र, यावेळी त्याचा संयम सुटला.

विजय, निकिता आणि कार्तिकच्या कनेक्शनबद्दल सांगायचे तर, कार्तिकने २००७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत लग्न केले. मात्र, काही काळानंतर कार्तिकच्या पत्नीचे मुरली विजयसोबत अफेअर सुरू झाले. जेव्हा निकिताने कार्तिकला याची माहिती दिली तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम कार्तिकच्या फॉर्मवरही झाला. मात्र, नंतर कार्तिकने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले. त्याचवेळी विजय आणि निकिता यांनीही लग्नगाठ बांधली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या