मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians New Jersey :मुंबई इंडियन्सनं लाँच केली नवी जर्सी, हे बदल तुमच्या लक्षात आले का?

Mumbai Indians New Jersey :मुंबई इंडियन्सनं लाँच केली नवी जर्सी, हे बदल तुमच्या लक्षात आले का?

Mar 10, 2023 03:54 PM IST

Mumbai Indians New Jersey IPL 2023 : आयपीएल २०२३ साठी मुंबई इंडियन्सने त्यांची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. चाहते ही जर्सी त्यांच्या नाव आणि नंबरसह कस्टमाइज खरेदी करू शकतात.

Mumbai Indians New Jersey
Mumbai Indians New Jersey

मुंबई इंडियन्सच्या (MI) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) साठी नवीन जर्सी लाँच केली आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने आपल्या नवीन जर्सीच्या रंगात आणि डिझाइनमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल केलेला नाही. मुंबईची ही नवीन जर्सी शंतनू आणि निखिल यांनी डिझाइन केली आहे. मुंबईची नवी जर्सी निळ्या आणि सोनेरी रंगात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईची ही जर्सी चाहतेही खरेदी करू शकतात. जर्सी लाँच झाल्याच्या दिवसापासून पुढील ७ दिवस Mi शॉपवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच वेळी, ७ दिवसांनंतर मुंबईची ही नवीन जर्सी इतर शॉपिंग प्लॅटफॉर्मवर देखील विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

चाहते जर्सीवर स्वता:चं नाव आणि नंबर छापू शकणार

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही नवीन जर्सीची लॉँच केली आहे. याशिवाय, मुंबई संघाने आपल्या ट्विटर हँडलद्वारे आणखी एक नवीन गोष्ट जाहीर केली आहे, ती म्हणजे चाहते आता मुंबई इंडियन्सचे चाहते जर्सी स्वतःच्या आवडीनुसार कस्टमाइज करून खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ, चाहते त्यांचे नाव आणि त्यांच्या आवडीचा कोणताही क्रमांक छापून मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी ऑर्डर करू शकतात आणि खरेदी करू शकतात.

मुंबई इंडियन्सचे हे नवे पाऊल नक्कीच त्यांच्या चाहत्यांना पूर्वीपेक्षा जास्त आकर्षित करेल आणि प्रभावित करेल. मात्र, आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्स दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने एक-दोन वेळा नाही तर ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. परंतु आयपीएलचा शेवटचा हंगाम या सर्वात यशस्वी संघासाठी सर्वात वाईट होता. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२ मध्ये पॉइंट टेबलमध्ये दहाव्या स्थानावर होता.

WhatsApp channel