मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians च्या खेळाडूचा वनवास संपला! ९ वर्षे ३ महिन्यांनी आईला भेटला

Mumbai Indians च्या खेळाडूचा वनवास संपला! ९ वर्षे ३ महिन्यांनी आईला भेटला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 03, 2022 05:24 PM IST

कार्तिकेयने (kartikeya singh) क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले कुटुंब राज्य सोडून दिल्ली गाठली होती. तिथे त्याने आपला खर्च भागवण्यासाठी एका कारखान्यात कामही केले. काही काळानंतर त्याला कुटूंबियांनी घरी परत बोलावले. मात्र, तो गेला नाही.

kumar kartikeya
kumar kartikeya

भारतातील बहुतांश तरुणांना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असते. देशातील लोक इतर खेळांमध्येही रस दाखवतात. पण क्रिकेटच्या क्रेझसमोर इतर खेळांना तितकेसे महत्त्व मिळत नाही. अव्वल स्तरावर पोहोचलेले क्रिकेटपटू असोत किंवा तिथे पोहोचण्यासाठीची स्पर्धा करणारे युवा क्रिकेटपटू असोत प्रत्येकाची स्वतःची एक गोष्ट प्रेरणादायी गोष्ट आहे. जी अनेकांसाठी नेहमी प्रेरणा ठरते.

ट्रेंडिंग न्यूज

अशीच एक कहाणी आहे, मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू कुमार कार्तिकेयची. जो क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठीच्या प्रवासात आपल्या कुटुंबापासून तब्बल ९ वर्षे ३ महिन्यांपासून लांब राहिला.

मात्र, आता एवढ्या वर्षांनंतर तो त्याच्या आईला आणि कुटुंबाला भेटला आहे. विशेष म्हणजे कार्तिकेयने या वर्षी झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशला चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच, त्यापूर्वी त्याने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपली विशेष छाप पाडली होती.

यासाठीच कार्तिकेय ९ वर्षे कुटुंबापासून दूर राहिला. त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण केले आहे.

कार्तिकेयने क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले कुटुंब राज्य सोडून दिल्ली गाठली होती. तिथे त्याने आपला खर्च भागवण्यासाठी एका कारखान्यात कामही केले. काही काळानंतर त्याला कुटूंबियांनी घरी परत बोलावले. मात्र, तो गेला नाही.

अशा परिस्थिती त्याला दिल्लीकडून खेळण्याची संधीही मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला त्याची सुरुवात मध्य प्रदेशकडूनच करावी लागली. तेथूनच त्याची मुंबई इंडियन्समध्येही निवड झाली. या डावखुऱ्या फिरकीपटूने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली. तसेच, त्याच वर्षी मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने दमदार कामगिरी करत संघाला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आईला भेटल्यानंतर कार्तिकेय सिंह भावूक

क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले, त्यानंतर ९ वर्ष ३ महिन्यांनंतर कार्तिकेय सिंह कुटुंबाला भेटायला आला. इतक्या वर्षांनी जेव्हा तो त्याच्या आईला भेटला. तेव्हा माझे हृदय आणि डोळे दोन्ही भरून आले असेल. कदाचित याच कारणामुळे त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्याच्या भावना त्याला जगाला सांगता आल्या नाहीत.

कॅप्शनमध्ये त्याने फक्त, "९ वर्ष ३ महिन्यांनंतर मी माझ्या आईला आणि कुटुंबाला भेटलो. माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही." असे लिहिले आहे.

WhatsApp channel