मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jofra Archer IPL : जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर?, मुंबई इंडियन्ससाठी समोर आली मोठी अपडेट

Jofra Archer IPL : जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर?, मुंबई इंडियन्ससाठी समोर आली मोठी अपडेट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 26, 2023 12:22 PM IST

Jofra Archer IPL 2023 : आयपीएलच्या पाच सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चर खेळलेला नाही. त्यामुळं आता मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jofra Archer Injury Update News
Jofra Archer Injury Update News (AP)

Jofra Archer Injury Update News : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह खेळत नसल्यामुळं जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीची धुरा संभाळणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आयपीएलच्या दोन सामन्यांत मुंबईकडून खेळल्यानंतर जोफ्रा आर्चर एका किरकोळ सर्जरीच्या तपासणीसाठी बेल्जियमला रवाना झाला आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर्चर खेळला होता, त्यानंतर सलग चार सामन्यांमध्ये तो उपलब्ध नसल्यामुळं कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला संधी दिली होती. त्यामुळं आता जोफ्रा आर्चर विदेशात गेल्यामुळं तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात परतणार की नाही, याविषयी साशंकता आहे. त्यामुळं आता सलग दोन पराभवामुळं संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये खेळायला येण्यापूर्वी जोफ्रा आर्चरवर बेल्जियममध्ये एक सर्जरी झाली होती. आयपीएलमध्ये दोन सामने खेळल्यानंतर जोफ्रा आर्चर वैद्यकीय तपासणीसाठी युरोपमध्ये दाखल झाला आहे. तो कधीपर्यंत भारतात परतेल, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. परंतु राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आर्चर मुंबईकडून खेळणार असल्याचं बोललं जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेपूर्वी तो कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीये. त्यामुळं सर्जरी झाल्यानंतर तो सातत्यानं वैद्यकीय तपासणी करत फीट राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आता बेल्जियममधून परतल्यानंतर आर्चर मुंबईकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती आहे.

GT vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभवाचं कारण काय?, संतापलेल्या रोहित शर्माने सगळंच सांगितलं

कोहली-फाफने जोफ्रा आर्चरला धुतलं...

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी झाला होता. त्यावेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांची आतिशबाजी केली होती. याशिवाय पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यातही आर्चरला खास कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळं आता युरोपातून परतल्यानंतर जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्ससाठी कशा पद्धतीने कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

WhatsApp channel