मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians: IPL ची तयारी सुरु, अर्जुनसह 'हे' नवीन खेळाडू इंग्लंडला पाठवणार

Mumbai Indians: IPL ची तयारी सुरु, अर्जुनसह 'हे' नवीन खेळाडू इंग्लंडला पाठवणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 29, 2022 06:46 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी (mumbai indians) आयपीएलचे १५ (IPL) वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले होते. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.

rohit sharma
rohit sharma

IPL १५ मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सने आतापासूनच पुढच्या मोसमाची तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सचे युवा खेळाडू हे तीन आठवड्यांसाठी इंग्लंडला जाणार आहेत. आधुनिक प्रशिक्षण सुविधांव्यतिरिक्त, हे  युवा खेळाडू तेथील काउंटी संघांसोबत टी-२० सामने खेळणार आहे.

या युवा खेळांडूमध्ये टिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना तिथे तगड्या टी-२० क्लबसोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेतील युवा खेळाडू डिवाल्ड ब्रेव्हिस हे देखील या दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफही इंग्लंडमध्ये उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचे १५ वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.

या दौऱ्यासाठी संभाव्य संघः तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, बासिल थंपी, मुरुगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर, डिवाल्ड ब्रेविस.

WhatsApp channel